काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात निवडणूक अधिका-यांकडे तक्रार

नेहा चौधरी Sat, 19 Oct 2024-8:48 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपाचा तिढा अद्याप महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात दिसून येतोय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES...

Latest Updates

  • काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार केली आहे. आशिष शेलार यांनी व्होट जिहाद या शब्दाच्या वापर केल्याप्रकरणी, वर्षा गायकवाड यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार केली. शेलारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • झारखंड निवडणूक 2024 साठी भाजपने 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

  • कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. 

  •  शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. हिंगोलीत एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप होतोय.बांगरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 24 तासात खुलासा करा अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे. 

  • बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे शरद पवार पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत. बेलाड पियर च्या राष्ट्रवादी कार्यलयात किव्हा वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होईल ...

  •  विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. 

  • संजय राऊत आणि माझ्यात वाद नाहीत- नाना पटोले 

    तुम्ही आमच्यात वाद लावू नका. माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात वाद नाही. संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की, आमची अधिकृत भूमिका काही नाही. आम्ही काल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आमच्याकडे ३० ते ३५ जागांचा अजूनही निर्णय होऊन अपेक्षित आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी प्रयत्न करत असतो.
    मोठा भाऊ छोटा भाऊ नाही असं काही नाही.रमेश चेन्नीथला मातोश्रीलाही जाणार आहेत आणि शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.आज प्रभारी येणार आहेत. त्यांना वेगवेगळ्या भागातल्या मतदारसंघांबाबत आढावा घेतला जाणार आहे

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मराठी बांधवांकडून केणेकरांच्या कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्ते-पोलिसांमध्ये धक्काबुक्की

    संभाजीनगरचे भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या कार्यालयाची तोडफोड मराठा बांधवानी करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मराठा बांधवांनी केणेकरांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. संजय केणेकर यांनी जरांगेंबाबत अपशब्द वापरल्यानं त्यांच्या कार्यालयायाती तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यता आलाय. मात्र वेळीच पोलिसांनी कार्यकर्तायांना रोखलंय. यावेळी कार्यकर्ते आणि  पोलिसात धक्काबुक्की झालीय. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले
    मुंबईतील उमेदवार 
    १) आदित्य ठाकरे - वरळी 
    २) सुनिल राऊत - विक्रोळी 
    ३) सुनिल प्रभू - दिंडोशी 
    ४) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व 
    ५) वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व 
    ६) रमेश कोरगावंकर - भांडुप पश्चिम
    ७) संजय पोतनीस - कलिना 
    ८)विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर - दहिसर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मुंबई व्यतिरिक्त उमेदवार 
    ९) भास्कर जाधव - गुहागर 
    १०) कैलास पाटील - धाराशिव 
    ११) उदयसिंह राजपूत - कन्नड 
    १२) राहुल पाटिल - परभणी 
     १३) राजन साळवी - राजापूर 
    १४) वैभव नाईक - कुडाळ 
    १५) नितीन देशमुख- बाळापूर
    १६)शंकरराव गडाख-नेवासा
    १७) स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ
    १८) सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
    १९)अद्वय हिरे - मालेगाव बाह्य 
    २०) नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ
    २१) अनिल कदम - निफाड
    २२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली 
    २३)सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण 
    २४)मनोहर भोईर - उरण 
    २५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य 
    २६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम 
    २७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
    २८)कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत
    २९)सुरेश बनकर- सिल्लोड  मतदारसंघ - 
    ३०) राजन तेली - सावंतवाडी 
    ३१) दीपक आबा साळुंखे - सांगोला

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले

    शिवसेना UBT पक्षाचे 31 उमेदवार ठरले, असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबईतील 8 उमेदवारांची यादी समावेश करण्यात आलंय. 
    शिवसेनेच्या उमेदवारांची संभाव्य यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. तर 2 आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवडीतून अजय चौधरी आणि चेंबूरमधून प्रकाश फातर्फेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याच बोलं जातंय. 

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : पुण्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा

    विधासभान निवडणुकीचे पडघम वाजले असून पुण्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा पाहिला मिळतोय. माजी महापौर कमल व्यवहारे निवडणूक लढण्याचा तयारीत आहे. काँग्रेस नेत्या कमल व्यवहारे बंडाच्या तयारीत असून रवींद्र धंगेकरांचं टेन्शन वाढणार आहे. 

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार गुवाहाटीला 

    कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार आहेत. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे प्रचार सुरू करणार आहे. आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीचा मुंबई जागा वाटपाचा तिढा सुटला? कोणाला किती जागा पाहा

    महायुतीचा मुंबई जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई शहरातील 36 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ मिळणार. मुंबईतील 36  विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे जागावाटप असे असण्याची शक्यता.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    HEDAR: मुंबईतील 36  विधानसभा मतदारसंघाचे महायुती जागावाटप

    १) भाजप 18

    २) शिवसेना 16

    ३) राष्ट्रवादी काँग्रेस 2 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रत्नागिरीचे ते उमेदवार ठरले?

    रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निश्चित झाले, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम, गुहागरमधून आमदार भास्कर जाधव, राजापूरमधून आमदार राजन साळवी हे तीन उमेदवार निश्चित झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राजन साळवी, भास्कर जाधव 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याच बोलं जातंय. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप निश्चित नाही. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण मतदारसंघात गाठीभेटी सुरु

    साताऱ्यातील मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीय. पाटणमध्ये घेतलेल्या बैठकीत महायुतीकडून तयार केलेलं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर प्रकाशित करण्यात आलं. तसंच ज्यांची विकासाची कामे झाली आहेत. ती जनता आमच्या सोबत राहतील,  असा विश्वास यावेळी देसाईंनी व्यक्त केलाय. 

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : सोलापूर शहर मध्यच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच

    सोलापूर शहरातील एका मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकलाय. शिवसेनेकडून सोलापूर शहरमध्यसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे इच्छुक आहेत.. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे.. त्यामुळे आता हा मतदारसंघ महायुतीत कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सा-यांच लक्ष लागलंय. 

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघात पोस्टर वॉर 

    रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर कार्यकत्यांमध्ये पोस्टर वॉर सुरू आहे. किरण सामंतांच्या पोस्टरला राजन साळवी समर्थकांकडून उत्तर देण्यात आलंय. राजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्याच लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर रंगलंय. 

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : रायगडमधील काँग्रेस सक्रिय 

    विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रायगडमधील काँग्रेस सक्रिय झालीये... पक्ष निरीक्षकांनी अलिबागमधील काँग्रेस भवनात बैठक घेतली.. कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यांना प्रशिक्षण दिलं...तर महाविकास आघाडीने काढलेल्या गद्दारांचा पंचनामा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं...

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : धुळ्यातील ग्रामीण मतदार संघाच्या जागेवरुन महासंग्राम 

    धुळ्यातील ग्रामीण मतदार संघासाठी भाजपकडून बाळासाहेब भदाणे आणि राम भदाणे इच्छुक आहेत...  मात्र  माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी उडी घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय... खासदारकीला पडल्यानंतर  भामरे  पुन्हा धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी  इच्छुक असल्याची चर्चा रंगलीय...  

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज बैठक

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज मुंबईत बैठक होणारेय. या बैठकीला हर्षवर्धन पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यताये. नुकतीच तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांची संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पत्राद्वारे कळविले आहे. या संसदीय मंडळाची आज मुंबईत बैठक पार पडणारेय.

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मविआत अद्यापही 28 जागांवर तिढा- सूत्र

    मविआत अद्यापही 28 विधानसभा जागेवरून वाद सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा कायम आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीचं जागावाटप फायनल - सूत्र 

    महायुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय. दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत विधानसभेचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती आहे.. दिल्लीत अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झालीय.. लवकरच आता राज्यात जोरदार प्रचार करण्यात येणार आहे.. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link