Maharashtra Breaking News LIVE: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

Wed, 16 Oct 2024-8:32 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

Latest Updates

  • लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

    अमोल कीर्तीकर हे लोकसभेसाठी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढले होते. यावेळी 48 मतांनी कीर्तीकर यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवू शकतात. याच मतदार संघात अमोल कीर्तिकर मैदानात उतरणार असलायची माहिती आहे. 

  • नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ

    नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. संविधान चौकात हा कार्यक्रम सुरु होता. यावरून "अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती शिलक्क आहे? याला हा पुरावा आहे. याना संविधान मान्य नाही. व्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही आणि कोणत्याही परिस्थितीत व्याख्यान बंद पडावं असा यांचा प्रयत्न आहे." असं श्याम मानव   म्हणाले. 

  • थोड्याच वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची होणार बैठक 

    थोड्या वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल दाखल झाले आहेत. संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाजप मुख्यालयात दाखल होणार आहेत. 

  • आमदार झिशान सिद्दिकी मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला  

    आमदार झिशान सिद्दिकी मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचले आहेत. ते पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पहिल्यांदाच झीशान सिद्दिकी पोलीस आयुक्तालयात पोहोचले आहेत. 

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज होऊ शकते जाहीर 

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून मायक्रो मॅनेजमेंटच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 60 ते 70 उमेदवारांचं नावे असलेली पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते. यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती सूत्रांनी झी24तासला दिली आहे. मुख्यत्वे ज्या जागा निवडून येण्यासाठी कुठलीही अडचण नाही अशा सेफ आणि निवडून येण्याची गॅरंटी असलेल्या मतदार संघाच्या संदर्भात आज घोषणा केली जाईल अशी माहिती आहे. यात मुख्यत्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण गिरीश महाजन व इतर मंत्र्यांच्या मतदारसंघांचा समावेश असू शकतो.

  • थोड्याच वेळात काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीची बैठक 

    काँग्रेस पक्षाची थोड्याच वेळात हिमाचल भवनमध्ये बैठक होणार आहे. या मिटिंगसाठी  स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन मध्ये दाखल झालेलले आहेत. या मिटिंगसाठी थोड्याच वेळात नाना पटोले विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड बाळासाहेब थोरात देखील येणार आहेत. 

  • देवेंद्र फडणवीस संध्याकाळी दिल्लीत पोहोचणार

    विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीत जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस सेंट्रल इलेक्शन कमिटी म्हणजेच CEC म्हणजेच केंद्रीय निवडणूक समितीसाठी दिल्लीत जाणार आहेत. आजच्या या बैठक नंतर भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही बैठक भाजप मुख्यालय मध्ये संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा ही उपस्थित असणार आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

    हिंगोलीच्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जन्मदात्या बापानेच 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: 'पवार साहेबांना आव्हान की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा'

    विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा ठरवावा, आमच्याकडे कुणालाही डोहाळे लागलेले नाहीत. पवार साहेबांना आव्हान की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.श्रीनगर इथल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर मध्ये घेतली शपथ.सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: कॉमनमॅन सुपरमॅन झाला पाहिजेः एकनाथ शिंदे
     
    विरोधकांनी आमच्या विरोधात एक व्हिडिओ बनविला गेला. बनवणारा शुद्धित होता का? 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यावर पैसे टाकले. लाडकी बहीण योजनेला कोणी टच केला कर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: आमची कामं रिपोर्ट कार्डमध्ये मावत नाहीः एकनाथ शिंदे
     
    पायाभूत सुविधा वेगाने सुरू आहेत. एवढी कामं केली पण सगळंच रिपोर्टमध्ये मांडता आलं नाही. रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  

  • Maharashtra Breaking News LIVE: मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवणारः देवेंद्र फडणवीस
     
    मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवणार. 145 सिंचन प्रकल्पाला सुधारित मान्यता दिली. नदीजोड प्रकल्प सुरू केला. सिंचन क्षेत्रात भरीव कामगिरी केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: आमचं सरकार गतीशीलः देवेंद्र फडणवीस
     
    आमच्या कामाची गती रिपोर्ट कार्डमधून दिसणार आहे. हे गती आणि प्रगतीचं सरकार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: वीज माफी योजना कायम करणारः अजित पवार

    लाडकी बहिण योजना तात्पुरती नाही, विरोधकांकडून फेक नरेटिव्ह. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. वीज माफी योजना कायम करणार, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद; रिपोर्ट कार्ड केलं प्रकाशित

    आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला.आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. यांनी तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.  

  • Maharashtra Breaking News LIVE: महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद; रिपोर्ट कार्ड केलं प्रकाशित

  • Maharashtra Breaking News LIVE:  पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या CEC ची आज दिल्लीत बैठक.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात होणार बैठक.2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झालेल्या नावांमधून मतदार संघ निहाय उमेदवारांच्या नावावर आज शक्कामोर्तब होणार. भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. आजच्या बैठकीनंतर पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

  • Maharashtra Breaking News LIVE:  इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध भाजपा संघर्ष

    कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक मतदार संघात महायुतीमध्येच अंतर्गत कलह असल्याचं उघड झालं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आवाडे पिता पुत्रांना स्वीकारताना दिसत नाहीयेत. त्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE:  राज्यात घडामोडींना वेग

    राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग. जागा वाटपाबाबत अंतिम चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा दिली दौरा

  • Maharashtra Breaking News LIVE: अंधेरीतील लोखंडवाला येथील इमारतीला आग; तीन जणांचा होरपळून मृत्यू

    अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एका इमारतीला आग लागली आहे. दहाव्या मजल्यावर ही आग भडकली असून आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  तूरीच्या बाजारभावात घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत तूर पिकाच्या बाजारभावात घसरण होत आहे.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तूरीला प्रति क्विंटल ८५७० ते ९१५५ रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने बाजारात आवकही घटल्याचे दिसून येते.

  • Maharashtra Breaking News LIVE:  वर्ध्याच्या देवळी मतदारसंघावर शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपचाही दावा

    वर्ध्याच्या देवळी मतदार संघात महायुतीमध्ये जागा कुणाच्या वाट्याला जाणार यावर चर्चा सुरू असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी युतीमध्ये देवळी येथून लढण्याची तयारी केली आहे. देवळी मतदार संघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाने देखील मागितली आहे. शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडून देवळी वर दावा करण्यात आला होता. तर आता भाजपकडून राजेश बकाने यांनी जोरदार तयारी चालविली असून देवळी विधानसभेवर भाजपने दावा केला आहे

  • Maharashtra Breaking News LIVE:  मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली

    रत्नागिरी- मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली. चिपळूण जवळील परशुराम घाटातील संरक्षक भिंत मध्यरात्री कोसळली मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे.  सध्या या महामार्गावरची वाहतूक एकेरी लाईन मध्ये सुरू गेली दोन ते तीन वर्ष परशुराम घाट हा पूर्णपणे खोदून हा महामार्ग तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या महामार्गावर दरड कोसळणे आणि डोंगर खचणे सुरूच आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: भाजपवर नाराज असलेले संजय काकडे आज देवेंद्र फडणवीसांना भेटणार

    काही दिवसापूर्वी संजय काकडे हाती तुतारी घेणार अशी होती चर्चा.मात्र आज फडणवीस यांची भेट घेत असल्याने काकडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. दरम्यान आचासंहितेनंतर निर्णय जाहीर करु अशी भूमिका काकडेंनी या आधी घेतली होती.

  • Maharashtra Breaking News LIVE: विधानसभेसाठी महायुती- मनसे एकत्र येणार?

    महायुती आणि मनसे विधानसभेसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. महायुती आणि मनसेमध्ये युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती मनसेविरोधात उमेदवार नाही, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळं आता मनसे-महायुती एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

    पुण्यात अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे दिले आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दीपक मानकर यांना संधी न दिल्याने पदाधिकारी आक्रमकदीपक मानकर हे अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत. याआधीही पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना भेटून दीपक मानकर यांना आमदार करावं अशी केली होती मागणी

  • Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात

    जाहीरनाम्याऐवजी भाजपने त्याचे स्वरूप 'अंमलबजावणी आराखडा' असे करण्याचे केले निश्चित. पारंपरिक जाहीरनाम्याच्या पुढे जाऊन त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल, अशी माहिती भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्राबुद्धे यांनी दिली.

  • Maharashtra Breaking News LIVE: महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर

    महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाकणकर यांना पुन्हा पुढील तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आणि बाल विकास विभागाकडून तसा आदेश जारी केला गेला आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका

    कालच राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. तर मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link