Maratha Andolan Live : राज्यपाल बैठकीनंतर मुख्यमंत्री-गृहमंत्री एकत्रित बैठक करणार

राजीव कासले Mon, 30 Oct 2023-9:55 pm,

Maratha Andolan Live : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आता आक्रमक झालाय, आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशी जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावलीय. दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. साताऱ्यातल्या कराड शहरात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर शिर्डीत बंदची हाक देण्यात आली आहे.

Latest Updates

  • हालचालींना वेग
    मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांची चर्चा होणार आहे. या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक होतेय.

  • बीडमध्ये संचारबंदी लागू

    बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीड जिल्हा मुख्यालय आणि सर्व तालुका मुख्यालयाच्या 5 कि.मी. परिसरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केलीय. जनतेने या काळात रस्त्यावर उतरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

  • मराठा आरक्षणाच्या पाठिंबासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बीडचे गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

  • शांतता राखण्याचं आव्हान
    मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय, बीडमध्ये याचे तीव्र पडसाद पाहिला मिळताय. नेत्यांच्या कार्यलयावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना घडल्यात. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. हिंसक आंदोलन थांबवा नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच सत्ताधाऱ्यांनीच जाळपोळ केल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. 

     

  • बीड
    बीडमध्ये मराठा समाजाचा उद्रेक थांबण्याचं नाव घेत नाहीए. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी एनसीपी भवन जाळल्यानंतर आता भाजप नेत जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवलं आहे. 

     

  • आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन फोडत पेटवून दिलं. राष्ट्रवादी भवनला आग  लावली.  आगीत राष्ट्रवादी भवन जळून खाक झाले आहे. 

  • छगन भूजबळांच्या घराची सुरक्षा वाढवली

    मराठा आंदोलन पेटलं असताना आता मंत्री छगन भूजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भूजबळांनी मराठा आरक्षणावर सरती भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचं पहायला मिळतंय.

  • यवतमाळ येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.

  • बीडमध्ये कार्यालयांना कुलुप लावलं
    बीडमधल्या आष्टी इथे तहसीलसह सर्व कार्यालयाला मराठा आंदोलकांनी कुलूप लावलं..यावेळी आंदोलकांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांना आतमध्ये डांबून ठेवलं..जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत अशीच आंदोलन होतील,असा इशारा आंदोलकांनी दिला

  • मराठवाड्यात बसवर दगडफेक
    मराठवाड्यात एकूण बारा बसवर दगडफेक करण्यात आली. धाराशीवमध्ये 6 , जालन्यात 4 आणि नांदेड, परभणीत 2 बस फोडण्यात आल्या. बसतोडफोडीच्या पार्श्वभमीवर एकूण 3 हजार 331 बस फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत

  • परभणीत तहसीलदारांची कार फोडली
    परभणीतील मानवतच्या तहसीलदारांची मराठा आंदोलकांनी कार फोडली...परभणीच्या मानवत तालुक्यातील माणोलीत मराठा तरुण आज सकाळपासून जलकुंभावर जाऊन आंदोलन करत होते...या आंदोलनाला मानवतेचे तहसीलदार भेट द्यायला गेले होते...त्यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली...यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्यात...घटनास्थळी पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना समज दिली.

  • साताऱ्यात विराट मोर्चा
    आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता आक्रमक झालाय... साता-याच्या कराडमध्ये सकल मराठा समाजाच्या विराट मोर्चाला सुरुवात झालीय. कराड शहराच्या दत्त चौकातून सुरु झालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडक देणार आहे. मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहे..

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link