Pune Bypoll Election LIVE : चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला

Sun, 26 Feb 2023-6:58 pm,

Pune Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. त्यामुळे किती मतदार मतदानासाठी येतात याची उत्सुकता आहे. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्याला खिंडार फोडण्यासाठी महाविकास आघाडीने प्रचारात शक्तिपणाला लावली होती.

Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Pune Bypoll Voting)  पोटनिवणूक मतदानासाठी पुणेकरांनी मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केली आहे. दरम्यान चिंचवडमध्ये गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. ​ 


 

Latest Updates

  • चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला

    चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याची चिन्ह आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीत पाच वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदान झालंय. सहा वाजता मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत आहे. 

  • गिरीश बापट यांनीही बजावला मतदानाचा हक्क

    कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपा खासदार गिरीश बापट यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरले होते. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत होती.

  • मतदानासाठी थेट अमेरिकेतून गाठलं चिंचवड 

    रविवारची सुट्टी असल्याने कर्तव्यदक्ष नागरिकांनी मतदानाला बाहेर पडावे अशी अपेक्षा आहे. पण तरीही काही जण हे कर्तव्य पार पाडत नाहीयेत. पण काही जण मात्र लोकशाही मूल्ये जपताना दिसत आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानासाठी अमेरिकीतील कैलास टिळे आणि त्यांच्या पत्नीने मतदान केंद्र गाठलं आहे. 

  • Pune Bypolls LIVE :  भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत 18.5 टक्के मतदान झालंय. तर चिंचवड मतदारसंघात आतापर्यंत 20.68% मतदान झालंय. 

  • Pune Bypolls LIVE :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहेत. त्यांनी ट्वीट करुन मतदानासाठी घराबाहेर पडा असं म्हटलं आहे. 

  • Pune Bypolls LIVE :  दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांनी नारायण पेठेतील SNDT कन्या शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्यासह मुलगी आणि सून हे मतदानासाठी आले होते. यावेळी टिळक कुटुंबीय भावूक झाल्याच पाहायला मिळाल. मुक्ता टिळक सोबत नसताना पहिल्यांदाच मतदानासाठी आलो असल्याची भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली. कसबा विधानसभा भारतीय जनता पक्षाचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Pune Bypolls LIVE : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर राज्यात पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

  • Pune Bypolls LIVE : कसबा पेठे विधानसभा पोटनिवडणूकसाठी सकाळी  11 वाजेपर्यंत  8.25 टक्के तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकसाठी 10.45 टक्के मतदान झालं आहे. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे  यांनी गोपनियतेचा भंग केलाय.. त्यांनी मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी भाजप नेते धनंजय जाधव यांनी केलीये.. तर लोकांनी पाठवलेला फोटो ट्विट केल्याचं सांगत त्यांनी धनंजय जाधव यांचे आरोप रूपाली पाटील-ठोंबरे यांनी फेटाळून लावला आहे. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : आताची सर्वात महत्त्वाची बातमी...राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून गोपनीयतेचा भंग झाला आहे. मतदान केंद्रावर मतदान करताना त्यांनी ईव्हीएम मशीनचा फोटो काढला. एवढंच नाही तर त्यांनी हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. त्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांचावर कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर झालेल्या राडावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. पराभवाच्या भीतीने विरोधक गोंधळ घालत आहेत, असा आरोप त्यांनी (Sanjay Raut on Kasba Chinchwad Bypoll) केला आहे. दरम्यान आज रविवार आणि त्यात पुण्यात मतदान त्यामुळे पुणेकर मतदान केंद्रावर रांगा लावतील, असा विश्वास त्यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला. पोटनिवडणुकीत मविआचाच विजय होईल असंही ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात 5 ते 6 मंत्री ठाण देऊन आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी खडकमाळ आळीमधील एपिफनी शाळेत मतदान केल. मतदारांना पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप दवे यांनी केला आहे. पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी दवे यांनी केली. तर 8 ते 10 हजार फरकाने निवडून येईल असा विश्वास दवे यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : तरुण जेष्ठ नागरिक यांच्यासह महिला (Pune Bypoll Voting) देखील सकाळपासूनच मतदान करण्यासाठी येत आहेत. उन्हाचा पारा दुपारनंतर वाढणार असल्याने सकाळी पाहिल्या टप्प्यात नागरिक स्वयंस्फुर्तीने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला येणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक एकत्रित कुटुंब मतदानासाठी बाहेर पडत आहेत. याच ज्येष्ठांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates :  कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह (Pune Bypoll Voting) पार पडत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कसब्यात 6.5% तर चिंचवडमध्ये 3.52% मतदानाची नोंद झाली आहे. 

  • Chinchwad Bypoll LIVE Updates : आताची सर्वात मोठी बातमी...चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर राडा झाला. भाजप नगरसवेक सागर आंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंमध्ये धक्काबुक्की झाली.  पिंपळे गुरवमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.   

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates :   पुण्यात कसबा पेठ मतदारसंघातले  (Pune Bypoll Voting) भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान केलं. बाजीराव रस्त्यावर नूतन मराठी विद्यालय या शाळेत रासने यांनी मतदान केलं. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates :   पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Pune Bypoll Voting)  पोटनिवणूक मतदानासाठी पुणेकरांनी मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केली आहे. या परिसरात आयटी कंपनी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्निंग वॉकच्या निमित्ताने आयटी क्षेत्रातील लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.  

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. दोन्हीही मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येतोय. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्याला खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीने प्रचारात शक्तिपणाला लावलीय. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांची लढत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याशी होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीय. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्यामुळे तिरंगी लढत होतेय. भाजप आणि मविआच्या उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवणार असा विश्वास कलाटेंनी व्यक्त केलाय. मतदानाला जाण्याआधी त्यांना कुटुंबीयांनी औक्षण केलं. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह दिसून येतोय. मविआचे उमेदवार नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी भाजप आणि अपक्ष उमेदवाराचं आव्हान असलं तरी विजय मविआचाच होणार असा विश्वास काटेंनी व्यक्त केलाय. कार्यकर्त्यांचे कष्ट विजयाच्या स्वरुपात दिसतील असंही ते यावेळी म्हणाले. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. लक्ष्मण जगतापांच्या कामाला मतदार लक्षात ठेवून मतदान करतील असा विश्वास अश्विनी जगताप यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केला.

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होतेय. भाजपकडून अश्विनी जगताप, मविआकडून नाना काटे रिंगणात आहेत. तर राहुल कलाटे अपक्ष निवडणूक लढवतायत. तिन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केलाय. 

     

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी ही माहिती दिलीय. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबामध्ये पावने तीन लाख मतदार मतदान करणार आहेत. तर 
    चिंचवडमध्ये साडेपाच लाखाहून अधिक मतदार आहेत. कसबा मतदारसंघातून  270 मतदान केंद्र आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार 510 मतदार केंद्र आहे. मतदान करण्यासाठी मतदारराजा घराबाहेर पडत आहे. 

     

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates :भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक होणार आहे. आज दोन्ही मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. त्यामुळे किती मतदार मतदानासाठी येतात याची उत्सुकता आहे. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्याला खिंडार फोडण्यासाठी महाविकास आघाडीने प्रचारात शक्तिपणाला लावली होती. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांची लढत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याशी होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीय. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे आणि कसबामध्ये दुहेरी लढत होणार आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात मैदानात उतरल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्षचे राहुल कलाटे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : अजितदादांला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं हे मला माहित नाही आणि मला बोलायची गरज नाही. अजितदादांनी बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचं बारसं (नाव ठेवायला) करायला जाऊ नये. अजित पवारांनी माझ्या फद्यात पडू नये नाहीतर पुण्यात जाऊन त्यांचे मी बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी अजित पवार (Nanaryan Rane On Ajit Pawar) यांना दिला आहे.

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबा आणि चिंचवड (Kasbha Chinchwad By Election) मध्ये आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही जिंकणार माहिती असल्याने रडीचा डाव सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. नागपुरात (Nagpur) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) टीका केली. तसंच अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना आपल्या लोकांना संदेश देण्यासाठी असे बोलावे लागते असा टोला त्यांनी लगावला. 

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आज बंद राहणार आहेत. पुणे पोलिसांचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी मतदान केंद्राजवळ कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतला आहे.  कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.

  • Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : पुण्यातल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून बोगस मतदान होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार भाजपनं पोलिसांकडे केलीय. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मुस्लीम नेत्याने केलेल्या वक्तव्यानंतर बोगस मतदान होईल.. असं भाजपनं म्हटलंय. बोगस मतदान होणाऱ्या संभाव्य मतदान केंद्रांची यादी भाजप शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांना दिलीय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link