Sharad Pawar LIVE Updates : अजित पवारांना राजीनाम्याची पूर्वकल्पना होती - शरद पवार
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे.
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादीच्या सदस्यीय समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय...राजीनामा एकमताने नामंजूर करून पवारांकडे पाठवण्यात आलाय...अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत पदावरच राहावं असा ठराव पारित करण्यात आलाय...पवार हे देशाचे नेते आहेत...त्यांची राज्यासह देशाला गरज आहे...त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी राहावं अशी भावना सगळ्यांची आहे...
Latest Updates
अजित पवार कुठे आहेत?
शरद पवार यानी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत अजित पवार वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार आहेत कुठे असा प्रश्न विचार जात आहे. या ठिकाणी कोण उपस्थित आहे की नाही याची चर्चा आता करु नये. अजित पवार गैरहजर असल्याचा वेगळा अर्थ काढून नका असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय.शरद पवारच गॉडफादर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम राहाणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपण आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. उत्ताराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आता अधिक जोमाने काम करणार, पक्षात नवीन नेतृत्व घडवण्याचं काम करणार, माझ्या निर्णयामुळे पदाधिकारी, जनता कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. देशभरातील विविध पक्षांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती, त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.शरद पवारांची पत्रकार परिषद
शरद पवार आजच निर्णय घेणार?
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आला. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. आता पाच वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.आजच निर्णय घेणार
राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षदी राहायचं की नाही याबाबत शरद पवार आजच निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या समितीनं पवारांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर आता पवार काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आलाय. .एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आलाय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार सिल्व्हर, छगन भुजबळ,सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे सिलव्हर ओकवर पोहचल्या.राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा,जितेंद्र आव्हाड सिल्व्हर ओक वर शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल. नरहरी झिरवल आणि राजेश टोपे सिल्व्हर जयंत पाटील, एकनाथ खडसे सिल्व्हर ओक वर पोहचले. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सिल्व्हर ओक वर पोहचत आहेतअजित पवार, प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकवर दाखल
निवड समितीने सर्वानुमते शरद पवार यांचा राजीनामा नामुंजर केल्यानंतर बैठकीतील सर्व नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला - प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.
शरद पवार यांच्या घराचा बंदोबस्त वाढवला
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, एकच गोंधळ
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात एका कार्यकर्त्यांने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी हा कार्यकर्ता आक्रमक झाला होता. त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याला अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजुला नेले. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेय.
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांची 11.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
बैठकीसाठी सर्वच दिग्गज नेते उपस्थित
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीसाठी सर्वच दिग्गज नेते उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी निवड समितीच्या नेत्यांची बैठक सुरु
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात निवड समिती सदस्यांची बैठक सुरु झाली आहे. शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात ही बैठक होते आहे. या बैठकीसाठी अजित पवार, अनिल देशमुख, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित आहेत. शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे ही समितीही पवारच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार आहे.
शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार?
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे. शरद पवारांशिवाय दुसरा पर्याय नाही, देशातील विरोधी नेत्यांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड दाखल झालेत. तर सुप्रिया सुळेही बैठकीसाठी पोहोचल्या आहेत. आज बैठकीत प्रस्ताव पारित करून पवारांना कळवला जाणार आहे. शरद पवार वाय बी सेंटरला कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
कार्यकर्त्यांचे प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
सुनील तटकरे, एकनाथ खडसे कार्यालयात दाखल
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन कार्यकर्ते करत आहेत. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे, एकनाथ खडसे, अनिल देशमुख आणि नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे आदी नेते कार्यालयात दाखल झालेत.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवकचा ठराव
राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह होत आहे. अनेक ठिकाणी तसे ठरावही करण्यात आले आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मागणी करताना ठराव केला आहे. हा ठराव आजच्या बैठीत ठेवण्यात येणार आहे.
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अजित पवार भाजपमध्ये सामील होतील या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राणे यांचे वक्तव्य तथ्यहीन आहे. त्यात कुठलीही सत्यता नाही, असे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.
आम्ही राजीनामा नामंजूर करणार - भुजबळ
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांचा राजीनामा ना मंजूर करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आम्ही ठेवणार आहोत. आज प्रदेश कार्यालयात कमिटी प्रस्ताव पारित करेल, अशी माहिती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली.
अजित पवार, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates अजित पवार काही वेळात पार्टी कार्यालय येथे पोहोचले आहे. काही न भाष्य करता पार्टी कार्यालयात दाखल. तसेच सुप्रिया सुळे सिल्व्हर ओककडून राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाकडे रवाना झाल्यात. त्या कार्यालायात पोहोचल्यात.
शरद पवार कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा भेटणार
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार सकाळी साडेदहा वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता प्रदेश कार्यालयात कमिटी प्रस्ताव पारीत करेल आणि त्यानंतर तो शरद पवार यांना कळविण्यात येईल, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
ठाण्यात पवारांचे बॅनर्स लागले....
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरात 'साहेब' असे पोस्टर लावले आहेत. साहेबांशिवाय पर्याय नाही, असे यावर नमुद करण्या आले आहे. त्याआधी पवार यांनी राजीनामा घ्यावा म्हणून ठाण्यातील कार्यकारणीने आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रफुल पटेल प्रस्ताव ठेवणार
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत प्रफुल पटेल प्रस्ताव ठेवणार आहेत. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याबाबत हा प्रस्ताव असणार आहे.
पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता?
Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होत आहे. पुढील अध्यक्षाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथमच राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष निवडण्याची शक्यता जास्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या अचानक केलेल्या घोषणेने राज्याच्या राजकारणाचा नूरच पालटून गेला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. तुम्ही आपला निर्णय मागे घ्या असा आग्रह केला. काहींनी तर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ठिय्या मारला. दोन दिवसांपासून पवार यांची मनधरणी करण्यात येत होती. अखेर काल त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत झालेत. यावेळी पवार यांनी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. आज त्याबाबत महत्त्वाची बैठक होत आहे.