लोडशेडिंगमुळे डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये संताप
कल्याण-डोंबिवलीत अचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत अचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि परीक्षांच्या काळात सुमारे 4 ते साडेचार तासांचे लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतोय. सकाळी दीड ते 2 तास आणि दुपारी पावणे दोन ते दोन तास आशा दोन स्तरांमध्ये लोडशेडिंग सुरू आहे..
लोडशेडिंगची सकाळची वेळ 6 अशी ठेवण्यात आल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसलाय. त्यातही महिला वर्गाला सर्वाधिक फटका बसलाय.