नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा दावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा करण्यात येत आहे.
नाशिक : नाशिकच्या दिंडोरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. मडकीजाब, जांबूटके, येळवंडी, वनारवाडी, उमराळे, बुद्रुक, तळेगाव, हातानोरे गावांना सौम्य धक्के ग्रामस्थांना जाणवले आहेत. 8 वाजून 55 मिनिटांनी हे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दुसरीकडे प्रशासनाने मात्र भूकंपाची नोंद नसल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं तहसीलदार पंकज पवार यांनी लोकांना आवाहन केलं आहे.