स्वच्छ माथेरानसाठी स्थानिकांचा पुढाकार
माथेरानला जाणार असाल तर स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला काटेकोर राहावं लागणार आहे.
माथेरान : माथेरानला जाणार असाल तर स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला काटेकोर राहावं लागणार आहे... कारण माथेरान स्वच्छ ठेवण्यासाठी आता स्थानिकांनी पुढाकार घेतलाय.
मुंबई-पुण्याच्या पर्यटकांना जवळचं आणि आवडतं पर्यटन ठिकाण माथेरान.... पण इथे जेवढे पर्यटक जास्त, तेवढा कचराही जास्त.... सहाजिकच माथेरानमधला कचरा वाढत होता, पण आता हे चित्र बदलायचं स्थानिकांनी ठरवलंय... माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांकडून होणारा कचरा थांबवण्यासाठी माथेरानमध्ये येणा-या प्रत्येक पर्यटकाला गुलाबाचं फूल आणि कापडी पिशवी दिली जातेय....
स्वच्छ अभियान स्पर्धेत माथेरान सहभागी झाल्यापासून इथे कमालीची स्वच्छता जाणवतेय... माथेरानमधले घोडेवाले, हात रिक्षा वाले, हॉटेल व्यावसायिक, शाळकरी विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक संघटना सगळ्यांनीच स्वच्छ माथेरानसाठी हातभार लावलाय....
स्वच्छ माथेरानची सुरुवात तर चांगली झालीय... आता माथेरानचं हे स्वच्छ सुंदरपण टिकवायला हवं.... आणि अर्थात ती जबाबदारी पर्यटकांचीही आहे.
अमोल पाटील, झी मीडिया, माथेरान