रत्नागिरी : ३४ खलाशांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे ३४ खलाशी मुळचे रस्तागिरीतले आहेत. पण ते मुंबईत कुलाबा आणि रायगडमधल्या उरण बंदरावर राहायचे. सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे मूळ गावी परतायला कुठलंही वाहन नसल्याने हे ३४ खलाशी मुंबई आणि उरणहून बोटीने रत्नागिरीला आलेत. दोन बोटींमधून या ३४ मच्छिमारांनी रत्नागिरी गाठली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हाबंदी असल्याने समुद्रामार्गे मूळ गावी परतण्याची शक्कल त्यांनी लढवली. पण प्रशासनाच्या हे लक्षात आल्यावर त्यांच्यावर नियमभंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. सध्या या ३४ खलाशांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे. 



दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १५४ वर पोहचली आहे. मुंबई नव्यानं सहा रुग्ण आढळलेत. तर सांगलीत १२ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत रुग्णांची संख्या ही १२५ होती. आज सांगलीत सकाळपासून १२ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या २३ झाली आहे. तर नागपूरमध्ये आज नवीन ५ रूग्ण आढळले,यात २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तर मुंबईत सहा नवे रुग्ण वाढलेत. तर नवी मुंबईत आणखी एका रुग्णाची नोंद झाली आहे त्यामुळे आता राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १५४ वर गेली आहे.