बारामती : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देश ऑरेंज, ग्रीन आणि रेड झोनमध्ये विभागण्यात आलाय. जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात झोनप्रमाणे काही सवलती देण्यात आल्या आहेत. दरम्यान बारामतीत सराफा बाजारपेठेतील दुकाने सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे अनेक मुहूर्त चुकलेल्या बारामतीकरांनी सराफा दुकानांकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. सराफ व्यावसायिकांकडून दिलेल्या माहितीनुसार काल एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी केले.


दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, मानसिकतेमुळे लोक सोने खरेदी करणार नाहीत असे सगळे अंदाज फोल ठरवत लोकांनी सोन्याची लयलूट केली.


हे वाचा : येव नको, कोकणात क्वारंटाईन करूक जागा नाया...


शेअर्समध्ये होणारे कमालीचे चढउतार, बाजारातील मंदीची परिस्थिती, बँकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बँकाबाबतही निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना तसेच लग्नसराईचा मोसम यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी सांगितले. 



दुसरीकडे लॉकडाउनमुळे लग्नाची पध्दतच बदलून गेली, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न होऊ लागल्याने इतर सर्व खर्च कमी झाल्याने वाचलेले पैसे लोकांनी सोन्याच्या खरेदी गुंतविल्याचे चंदुकाका सराफ अँड सन्सचे किशोर शहा यांनी सांगितलं.