Lockdown: या जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा
दूध संकलन केंद्रे फक्त दोन तास सुरु राहणार
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 मे ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद आहेत. (Lockdown In satara)
दूध संकलन केंद्रे फक्त दोन तास सुरु राहणार आहेत. पेट्रोल फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच दिले जाणार आहे. आरोग्य सेवेशी निगडीत सर्व सेवा हे सुरु राहतील. अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तर कोरोनाचा संसर्गावर पूर्णपणे मात करता आलेली नाही. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे शिथिलता दिली जाण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे आज जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.