मुंबई : देशात एकिकडे वॅक्सीनेशन अभियान सुरु आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण इतके वाढत चालले आहे, राज्कीयात परत एकदा लॉकडाऊन लावायची गरज भासली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात नाशिकमध्ये वीकएन्ड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन लागू केला आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये काही भागात 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे़ लोकांच्या मनात असंतोष वाढला आहे. सोशल मीडियावर लोकांचा हा असंतोष आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळत आहे.


लॉकडाऊनमुळे सोशल मीडियावर सध्या #Lockdown ट्रेंड सुरु आहे, ज्या वरती लोकांचे वेगवेगळ्याप्रकारचे रीएक्शन देत आहेत.


काही असो ही सोशल मीडियावरती एक वर्ग आहे, जो या सगळ्या गोष्टींची मजा घेताना आपल्याला पहायला मिळतो. ज्यामध्ये लोकांनी अशा serious परिस्थितीत ही memes आणि जोक्स शेअर करायला सुरवात केली आहे.



सोशल मीडियावर काही लोकांना त्यांचे लॉकडाऊनमधले जूने दिवस आठवू लागले, तर काही लोकं फक्त या गोष्टीवर चर्चा करताना दिसले. त्याच बरोबर वेगवेगळ्याप्रकारचे Funny रीएक्शन देऊ लागले. यामध्ये "निर्ल्लज तू फिर आ गया?" आणि "तू जा रे" सारखे अनेक प्रतिक्रिया लोकं देत आहेत.