Maharashtra Lockdown : गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अकोल येथे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील जळगाव, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अकोला शहरातही निर्बंध वाढवण्यात आले आहे.


अकोला येथे दोन दिवसांचे लॉकडाऊन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता. अकोल्यात 2 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 मार्चच्या रात्रीपासून ते 14 मार्चच्या सकाळी  6 वाजेपर्यंत घरातून बाहेर निघण्यास परवानगी नसणार आहे. अत्यावश्यक सेवा या दरम्यान सुरू राहणार आहेत. अकोल्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा  प्रशासनाने हा निर्णय घेतला  आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात ऍक्टिव कोरोना रुग्णांची  संख्या  4500 च्या पुढे आहे.  गेल्या 10 दिवसात 4 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे.


पुण्यातही रात्रीची संचार बंदी लागू


कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली  आहे. एवढेच नाही तर, 31 मार्चपर्यंत पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मॉल, बाजार सिनेमा हॉल रात्री 10 पर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. घरपोच सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार. लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे. 


नागपूरमध्येही 15 मार्च  ते 21 मार्च दरम्यान कडक प्रतिबंध असणार आहे. यासंबधीची माहिती पालमंत्री नितिन राऊत यांनी  दिली आहे.


औरंगाबाद, जळगाव आदी शहरांमध्येही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.


राज्यात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेऊ शकतात. अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.