कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. 23 मे ते 1 जूनपर्यत कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. 24 मे पासून किराणा दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्री, मटण-चिकनची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यत सुरू राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनाकारण फिरण्यास मात्र प्रतिबंध असणार आहे. घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यत सुरू राहणार आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात मात्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 574 जणांना कोरोची लागण झाली आहे. तर 34 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात निर्बंधामध्ये शिथिलता आणली गेली असली तरा साताऱ्यात मात्र लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे.


सातारा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 मे ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद आहेत.