नागपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये नाहीतर जबरदस्ती घरात बसवावे लागेल असा विनंती वजा इशारा नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नागपुर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय रस्त्यावर उतरत जनतेला बाहेर न निघण्याचे आवाहन केले. यावेळी मुंढे बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरात लॉकडाऊन असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. लॉक डाउन मध्ये लोकांनी घरात बसने अपेक्षित आहे मात्र अजूनही लोक घरात बसत नाहीत हे दुर्देव असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले. लॉक डाउन मध्ये स्वतः घरात रहाणे. विषाणू पासून रोखण्यासाठी हा लॉक डाउन आहे. तरीही लोक घरात बाहेर पडत असल्याचे आयुक्त मुंढे म्हणाले.



मी परत विनंती करतो की घराबाहेर पडू नका.. आता नाका बंदी सुरू केली आहे. तुमच्या स्वतः च्या आरोग्यासाठी आम्हाला साथ द्या. तुम्ही घरात रहा. बाहेर पडू नका. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा अशी विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली.


11 नवे रुग्ण 


कोरोना व्हायरस जगात चिंतेचा विषय ठरत असताना आता भारतात ही कोरोनाचा धोका वाढला आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले असून देशात ही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशातील अनेक शहरं बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत.


किराणा दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि मेडिकल सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात कोरोेनाचा संसर्ग हा दुसऱ्या टप्प्यात आहे.


कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात जावू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. पण देशातून आणि राज्यातून कोरोनाचे वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत.