पुण्यात आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी थेट लढत
पुण्यात बापट विरुद्ध जोशी असा सामना रंगणार आहे.
पुणे : उमेदवार निश्चितीबाबत काँग्रेसनं घातलेल्या बहुचर्चित घोळानंतर पुणे लोकसभा निवडणूकींचं चित्र अखेर स्पष्ट झालय. गेल्या काही दिवसांतील नाट्यमय घडामोडीनंतर माजी आमदार मोहन जोशींच्या गळ्यात काँग्रसेच्या उमेदवारीची माळ पडलीय. त्यामुळे यावेळी पुण्यात बापट विरुद्ध जोशी असा सामना रंगणार आहे. पुण्यात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरवात झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर मिरवणुकीत सहभागी झाले. नरपतगिरी चौकात सभा झाली. बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यादेखील त्यात सहभागी झाल्या.
पाहा प्रविण गायवाड काय म्हणालेत?
दरम्यान, काँग्रेस पक्षानं निष्ठावान कार्यकर्त्यांला उमेदवारी दिलीय. मी काँग्रेसमध्ये आत्ताच प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यात काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया उमेदवारी नाकारण्यात आलेले प्रविण गायकवाड यांनी दिली आहे. पुणे लोकसभेसाठी अचानकपणे त्यांचं नाव चर्चेत आले होते. मात्र तितक्याच अचानकपणे ते मागे पडले. गायकवाडांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीनं आणलेला दबावदेखील काँग्रेसनं झुगारून लावला. आता गायकवाडांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला. मात्र आपण तसं न करता काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.