मुंबई :  काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तार आज आपला अपक्ष उमेदवार म्हणून केलेला अर्ज मागे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.. मात्र काहीही झाले तरी काँग्रेसच्या पराभवावर अब्दुल सत्तार ठाम आहेत. औरंगाबादमध्ये अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अब्दुल सत्तारांनी माघार घेतल्यास युतीच्या उमेदवाराला बळ मिळणार हे स्पष्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमधून उमेवारी न मिळालेले माजी मंत्री अब्दुल सत्तार आता काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणार आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसचा पराभव करण्यावर अब्दुल सत्तार ठाम असून ते युतीच्या उमेदवारांना सहकार्य करणार असल्याची माहिती आहे. औरंगाबाद आणि जालना दोन्ही ठिकाणी ते युतीला मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अर्ज भरला आणि काँग्रेसविरोधात दंड थोपटले होते.


काँग्रेसविरोधात प्रचार करणार आणि काँग्रेसला नमवणार, असा निर्धार त्यांनी याआधीही व्यक्त केला होता. औरंगाबाद आणि जालन्याच्या उमेदवारीवरून सत्तार नाराज होते. सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याचा फायदा हा शिवसेना - भाजपच्या युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका हा काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसचे उमेदवारी सुभाष झांबड यांना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले होते.