मुंबई : मतदानाच्या दिवशी नाशिकच्या मतदार यादीतून गहाळ झालेले समीर भुजबळ यांच्या आईचे हिराबाई भुजबळ हे नाव भायखळा येथील मतदान यादीत आढळून आलेले आहे. हा मतदार यादीतील घोटाळा असल्याचा आरोप भुजबळ कुटुंबियांनी निवडणूक आयोगाकवर केला होता. भुजबळांच्या आरोपानंतर निवडणूक विभागाने केलेल्या चौकशीत भायखळा यादीत त्यांचे नाव दिसून आले. पण कोणता घोटाळा नसून जाणिवपूर्क करण्यात आल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी भुजबळ कुटुंबीयांनी समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ या तिघांची नावे नाशिकच्या यादीत देण्याविषयीचा अर्ज केला होता. त्यानुसार ही तीनही नावे नाशिकमध्ये समाविष्ट करण्यात आली मात्र इतर सर्व नावे ही भायखळ्यात होती. मात्र मतदानाच्या दिवशी समीर भुजबळ यांच्या आई हिराबाई भुजबळ यांचे नाव मतदान यादीत नसल्यामुळे भुजबळ कुटुंबीयांनी आयोगाच्या अक्षम्य हलगर्जी विरुद्ध माध्यमांसमोर रान उठवले होते. 



मतदान केंद्रावरच संतप्त प्रतिक्रिया देत आयोगाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता तीन जणांचीच नाव शिफ्ट झाली. हा मतदार यादीतील घोटाळा नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट झाले आहे. हे जाणिवपूर्वक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.