Lok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...
Loksabha Election: देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहेत. तर मुंबईत 20 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वत्र ठिकाणी मतदानासाठी लोकांची लगबग सुरु आहे. अशातच मतदानासाठी सकाळी मतदान करुन सुट्टीवर जाण्याचा प्लॅनही लोक करत असतात. जिथे मतदान आवश्यक असेल तिथे मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली जाते. अशा परिस्थितीत, मतदानाच्या दिवशी दिलेली रजा ही पेड असते की अनपेड याबाबत तुम्हाला माहीती असणे आवश्यक आहे.
भारतात, 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे आणि मतदानाचा घटनात्मक अधिकार वापरला आहे. कार्यालयात वर्षभरात अनेक सार्वजनिक सुट्या असतात. काही मोठे वीकेंड देखील आहेत. पण सर्व सुट्ट्यांमध्ये मतदानाची सुट्टीही फिक्स असते. कर्मचारी सरकारी असो वा खासगी, त्याला मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. पण ही सुट्टी देणं कंपनीला बंधनकारक आहे का? मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतुदी आहेत आणि त्याचे उल्लंघन झाल्यास काय परिणाम होतील ते जाणून घेऊया.
मतदानाच्या सुट्टी मिळत नसेल तर काय सांगतो कायदा?
राज्यघटनेनुसार कोणत्याही नागरिकाला मतदानाचा अधिकार नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 (RP) नुसार मतदान होत असलेल्या भागात प्रत्येक कंपनीने मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी रजा द्यावी आणि त्या दिवसाचा पूर्ण पगार कंपनीला द्यावा लागतो.
काही मतदारांच्या बाबतीत त्यांना मतदान करण्यासाठी खेडेगावात जावं लागत . त्यानंतर मतदान करुन पुन्हा कामाच्या ठिकाणी यावं लागत. तेव्हा या सगळ्या प्रवासाला सुट्टी लागते. त्यामुळेच कंपनीने सुट्टी जाहीर करावी लागते. असे करण्यास कोणी नकार दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
रजा न मिळाल्यास तक्रार कोठे कराल?
मतदानाच्या दिवशी कार्यालयाकडून पगारी रजा मंजूर न केल्यास कर्मचारी ECI किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकरणाशी संपर्क साधू शकतात. तुम्ही तुमची तक्रार फक्त संबंधित ठिकाणी नोंदवू शकता. त्यानंतर निवडणूक आयोग संबंधित कार्यालयावर कारवाई करू शकतो. त्यामुळे कंपनीही अडवणूक न करता सुट्टी जाहीर करते.