Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील यांनी आता भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. माढ्यातील (Madha Loksabha) हेवीवेट कुटूंब असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून (Dhairyasheel Mohite Patil) उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशिल मोहिते पाटील आग्रही होते. पण रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशिल मोहित पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची वाट धरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. येत्या 14 तारखेला धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्यात मोहिते-पाटिल आणि शिरूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची भेट झाली होती. या दोन नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. 


मोहिते पाटील कुटुंबाने एकमतानं लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं असल्याचं जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केलं होतं.. धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील. माढा , सोलापूर, बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल. आम्ही मतदारसंघात चाचपणी करून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजप वरिष्ठ नेत्यांना समजलं पाहिजं खरी ताकत कुठं आहे. भाजपच्या 28 पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाहीत. सध्या भाजपमध्ये आवक सुरू आहे. पण भाजपमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करत आहोत. अशी प्रतिक्रिया जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली होती.


शरद पवार गटाकडून जानकरांना होती ऑफर
माढ्यातून शरद पवारांनी सुरुवातीला महायुतीमध्ये नाराज असलेल्या महादेव जानकर यांना मविआकडून लढण्याची ऑफर दिली. जानकरांना तिकीट देण्यामागे पवारांचा दुहेरी हेतू  होता. माढा मतदारसंघात धनगर मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसंच जानकरांचं मुळ गावंही याच मतदारंसघात येणाऱ्या माण-खटाव मतदारसंघात येतं. त्यामुळे मतदारसंघातील उमेदवार आणि धनगर मतांची गोळाबेरीज यामुळे माढा सर करता येईलच पण त्याचबरोबर राज्यभरातील आणि मुख्यत्वे शेजारच्या बारामती मतदारसंघात असलेल्या धनगर मतांचा फायदा मविआला होईल असं त्या मागचं गणित होतं. 


मात्र त्याचवेळी भाजपमध्ये नाराज असलेल्या धर्यशिल मोहिते पाटील किंवा फलटणचे संजीवराजे निंबाळकर हेही पवारांकडू लढू शकतात अशी चर्चा सुरू झाली. नेमकी हेच हेरून अजित पवारांनी डाव टाकला आणि जानकरांना महायुतीमध्ये आणलं. त्यांना परभणीतून तिकीट दिलं. मग आता पवारांचा उमेदवार कोण याची चर्चा नवाने सुरु झाली. कधी धर्यशिल मोहिते पाटील, तर कधी संजीवराजे निंबाळकर तर कधी सांगोल्याच्या गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांची नावे चर्तेत होती. 


यात धैर्यशिल मोहित पाटीला यांनी बाजी मारली आहे. मोहिते पाटील भाजपपासून दूर जाऊ नये यासाठी भाजप त्यांचं मन वळवण्याचा प्रय़त्न केला. तर राजेनिंबाळकर घराणे पक्षातून बाहेर पडू नये यासाठी अजित पवार प्रयत्न करत होते. दोन्ही कुटुंबाचा प्रभाव पाहता माढा, सोलापूर आणि सातारा या तीन मतदारसंघात या दोन्ही कुटुंबांच्या पक्षांतरचा परिणाम होऊ शकतो.