प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : नंदुरबार... सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा मतदारसंघ. नर्मदा आणि तापी नदीच्या विस्तीर्ण खोऱ्याचा भाग. तब्बल 67 टक्के आदिवासी लोकसंख्या. देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख देणाऱ्या आधार कार्ड प्रकल्पाची सुरूवात इथूनच झाली. राज्यातला पहिला मतदार याच मतदारसंघातून येतो. वर्षानुवर्षं इथल्या आदिवासी मतदारांना विकासाची स्वप्नं दाखवण्यात आली. मात्र ती कधीच प्रत्यक्षात उतरली नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार... समस्यांचं आगार 
सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आदिवासी बालकांच्या पाचवीलाच कुपोषण पुजलंय. आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारी आणि त्यामुळं होणारं स्थलांतर हा देखील मोठा 


कधीकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतरच्या 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून 2009 पर्यंत नंदुरबारमधून काँग्रेसचाच खासदार निवडून आला. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित लागोपाठ 9 निवडणुका जिंकल्या. मात्र आता हा बालेकिल्ला भाजपनं काबीज केलाय..


नंदुरबारचं राजकीय गणित
2009 मध्ये काँग्रेसच्या माणिकराव गावितांनी सपाच्या शरद गावितांचा 40 हजार मतांनी पराभव केला. मात्र 2014 च्या निवडणुकीआधी डॉ. विजयकुमार गावितांनी भाजपात प्रवेश केला. त्यांची कन्या डॉ. हिना गावितांना भाजपनं रिंगणात उतरवलं. डॉ. हिना गावितांनी माणिकराव गावितांसारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारून पहिल्यांदा भाजपचं कमळ फुलवलं. 2019 मध्ये डॉ. हिना गावितांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या के. सी. पाडवींना 95 हजार मतांनी हरवलं.
विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4 तर काँग्रेसचे 2 आमदार आहेत.


आता डॉ. हिना गावितांना विजयाच्या हॅटट्रिकसाठी भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसनं यावेळी माजी मंत्री के. सी. पाडवींचे चिरंजीव अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलंय. गोवाल पाडवी मुंबई हायकोर्टात वकील आहेत. पहिल्यांदाच ते सक्रीय राजकारणात उतरलेत.


सातपुड्यातली होळीची राख थंड होत नाही तोच निवडणूक प्रचाराचा शिमगा तापलाय. यानिमित्तानं गावित आणि पाडवी घराण्याचे तरुण, उच्चशिक्षित वारसदार नंदुरबारच्या आखाड्यात आमनेसामने उभे ठाकलेत. पंतप्रधान मोदींच्या गुडबुकमध्ये असलेल्या हिना गावित आणि नवखे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यातली ही टक्कर पाहण्यासारखी असणाराय.


माढाचा तिढा अखेर सुटणार?
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन शनिवारी अकलूजमध्ये येणार आहे. माढ्यात भाजपमधलं नाराजीनाट्य समोर आलंय.  विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले. धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत.  या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेतील आमदार समाधान अवताडे, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सुभाष देशमुख यांची काल बैठक घेतली. तेव्हा गिरीश महाजन मोहिते पाटील यांनी नाराजी दूर करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.