बीड : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी  काँग्रेस पदाधिकाऱ्यावर हल्ला केलाय. भाजप उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे संतापलेल्या पंकजा मुडेंच्या समर्थकांनी काँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांना बेदम मारहाण केली. बीड जिल्हाधिकारी कार्यलयातच ही मारहाण करण्यात आली. दादासाहेब मुंडे हे पूर्वी भाजपाचे पदाधिकारी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. सध्या ते कॉंग्रेस पक्षात असून त्यांनी प्रीतम मुडेंच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने त्यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

https://english.cdn.zeenews.com/sites/default/files/2015/05/11/356178-pankaja700.jpg


भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये घुसून ज्याप्रकारे मारहाण केली त्यावरून यांची बीडमध्ये किती दहशत आहे हे कळू शकते असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.यांच्या विरोधात कोणी आक्षेप घ्यायचे नाहीत, यांनी दडपशाही करत राहायच आणि केवळ उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने हे इतक्या पातळीवर जातात. या सर्वांची नावे माहीत आहेत. या गुंडांवर आजच्या आज कारवाई करावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.