चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपकडून हंसराज अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हंसराज अहिर यांच्यासमोर काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांचं आव्हान असेल. तर वंचित बहुजन आघाडीने राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी दिली आहे.


२०१४ निवडणुकीचे निकाल


२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा २,३६,२६९ मतांनी पराभव केला होता.


२०१४ निवडणुकींचे निकाल


उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

हंसराज अहिर भाजप ५,०८,०४९
संजय देवतळे काँग्रेस २,७१,७८०
वामनराव चटप आप २,०४,४१३
हंसराज कुंभारे बसपा ४९,२२९
प्रमोद सोरटे अपक्ष १०,९३०

रणसंग्राम | काय आहे चंद्रपूरकरांच्या मनात?


रणसंग्राम | काय आहेत चंद्रपूरच्या समस्या?