मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयकर विभागाला सक्रिय केले आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभागाची नजर असणार आहे.  सेल टॅक्स विभाग आणि एक्साईज विभाग यांच्या सोबत ही संयुक्त कारवाई होणार आहे.याच पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभेत 50 लाख रुपये पकडण्यात आयकर विभागाला यश आले आहे. तर बीडमध्ये आतापर्यंत 1 करोड 90 लाख आयकर विभागाने पकडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कार्यकर्त्यांवर आयकर विभागाची नजर असणार आहे. नेत्यांच्या खाजगी चॉपर्स आणि विमानांवरही आयकर विभाग लक्ष ठेवून असणार आहे. बीडमध्ये 20 तारखेला आणि रामटेक मतदारसंघात आज कारवाई केल्याचे आयगर विभागातर्फे सांगण्यात आले.यामध्ये रोकड रस्त्यावर वाहनातून नेताना कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आहे. विदर्भासह 24 लोकसभा मतदारसंघावर नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. आयकर आयुक्तांची नाशिकमध्ये  पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे. 



एकूण 28 जणांचे पथक तैनात याठिकाणी तैनात करण्यात येत आहे. नोडल ऑफिसर आणि व्हेरिफिकेशन ऑफिसरची नियुक्तीही केली जाणार आहे. तसेच एअर सरविलन्स केले जाणार आहे. विमानतळावरही यंत्रणा सतर्क असणार असेही यावेळी सांगण्यात आले आहे.  




गोंदिया, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नागपूर आणि नांदेड अशा एकूण सहा विमानतळांवर आयकर विभागाचे लक्ष असणार आहे. याबद्दल कोणाकडे अधिक माहिती असल्यास टोल फ्री नंबर 1800 233 3785 व्हॉट्सअॅप नंबर 9403391664, फॅक्स नंबर 07122525844 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.