लोकसभा निवडणूक २०१९: जळगाव लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम
२३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन भाजपमध्ये बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजपने ए.टी पाटील यांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. पण स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आली आणि ऐनवेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या देखील निवडणूक लढवत आहेत. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे. ए.टी पाटील यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
ए.टी पाटील | भाजप | ६४७७७३ |
अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील | राष्ट्रवादी | २६४२४८ |
बागुल व्ही.टी | बसपा | १०८३८ |
विजय निकम | अपक्ष | ९६१४ |
ललित शर्मा | अपक्ष | ८१४० |