सिंधुदुर्ग : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. लोकांना विचार 15 लाख मिळाले का? वर्षाला 2 लाख नोकऱ्या मिळाल्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपण एनडीए सोबत राहणार म्हणणारे नारायण राणे दुसरीकडे भाजपावर टीका करताना दिसत असल्याचीही विरोधकांमध्ये चर्चा आहे. 'धोका करू नका,जे हवं ते मागा पण सूर्याजी पिसाळ होऊ नका', अशी कळकळीची विंनती नारायण राणे यांनी बूथ कार्यकर्त्याना केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा नारायण राणे यांनी आधीच केली आहे. ते महाराष्ट्रात लोकसभेच्या काही जागा लढणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज पाच वर्षातच भाजपाची ही अवस्था झाली. यांचे खासदार, आमदार पालकमंत्री तोंड उघडतात का? लोकांना विचारा असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा नारायण राणेंनी याआधी केली होती. पण भाजपसोबत जवळीक वाढल्यानंतर ते भाजपचे खासदार झाले. युती करताना शिवसेनेचा याला विरोध होता. आता युतीही झाल्याने राणेंची कोंडी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपची युती होताच राणेंचा पत्ता आपोआपच कट झाल्याची चर्चा आहे. 




सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव नीलेश राणे यांना तर औरंगाबाद येथून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवणार आहेत. भाजपविरोधात उमेदवार देणार नाही, असे राणेंनी याआधीच जाहीर केले आहे मात्र शिवसेनेविरोधात आपले उमेदवार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले होते.