Uddhav Thackeray vs PM Modi Amit Shah BJP : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभेने जोर धरला आहे. येत्या 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशात प्रत्येक पक्षातील नेते आपल्या उमेदवाऱ्यांचा प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील उमेदवाऱ्यांसाठी सभा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी एकेकाळचा मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला. शिवसेनेचा नकली असा उल्लेख उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागला. (Loksabha Election 2024 Is that your degree to call Shiv Sena fake Uddhav Thackeray counters Narendra Modi Amit Shah fake Shiv Sena criticism)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?' या शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पलटवार केला. पालघरमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटातर्फे पालघर लोकसभेतून भारती कामाडी यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाजपवर थेट भा*$% जनता पक्ष अशी जहरीली टीका केलीय. 


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांसाठी केली. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. 


मग त्यांचे दुसरे पार्टनर खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा आले आणि मग ते बोलून गेले, शिवसेना नकली अशी टीका केली. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय, काय भा*** जनता पक्ष आहे, भेकड आहे. मी नुसते काहीही बोलतोय म्हणून बोलत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले.  ईडी,  सीबीआय, इनकम टॅक्सची बंदूक त्यांच्या डोक्यावर लावली आणि घेऊन गेले.  इथूनच ते पालघरमधून सुरतला घेऊन गेले,  असा हल्लाबोल ठाकरेंनी पालघरच्या सभेतून केला. 


'या लोकांना बंदर नको, विमानतळ हवे!'


मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी पालघरच्या विकासावरुन भाजपवरही निशाणा साधला. पालघर हा पर्यटनासाठी उत्तम असून त्याचा विकास झाला पाहिजे. पण भाजपला वाढवण बंदर नको, तर त्यांना एअरपोर्ट हवा आहे. तर सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला आणि इकडे वाढवण बंदर करायचे, तिकडे बारसूमध्ये रिफायनरी मीच रद्द केली होती आणि त्या जनतेचा विरोध असेल तर होणार नाही हे सुद्धा सांगतिले होतं. सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे ही यांची निती आहे. त्यामुळे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, याची आठवण उद्धव ठाकरेंनी यावेळी करुन दिली.