Rahul Gandhis Promise:आपल्या देशाची संपत्ती निवडक 15 लोकांच्या खिशात जात आहे. मीडियावर सरकारचा अंकुश आहे. मीडिया धन दंडग्यांच्या हातात आहे. मोदींनी 22 लोकांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. आम्ही सत्तेत आल्यास आम्ही 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकू. सगळ्या दलित, आदिवासी, मागसांना आरक्षण देणार असल्याचे आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला भरघोस आश्वासन दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील 90 टक्के जनतेपाशी काहीच नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जातनिहाय जनगणना करणार, सर्व संस्था, उद्योग व्यवसायांमधील प्रतिनिधीत्वचे सर्वेक्षण करणार
जातनिहाय जंगणनेनंतर मराठा आणि धनगरांना सर्व मागास वर्गांना आरक्षण देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 


मी जातीनिहाय जनगणनाविषयी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी असल्याचे सांगतात. आमची सत्ता आल्यांनंतर आम्ही अग्निविर योजना बंद करणार. देशातील जीएसटी हटवणार आहोत. 22 लोकांना वाटलेला पैसा देशातील शेतकऱ्यांना वाटणार आहोत. 



प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी एक लाख टाकणार. गरिबी रेषेच्या खालील महिलांना  ही रक्कम देणार. हे सगळं टकाटक करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 


आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार. ही कर्जमाफी एकदाच  होणार नाही. त्यासाठी स्वतंत्र शेतकरी कर्जमुक्ती आयोग स्थापन करणार आहोत. आयोग जेव्हा जेव्हा कर्जमाफी द्यायला सांगणार तेव्हा तेव्हा ती देणार. देशातील प्रत्येक तरूणाला पहिल्या नोकरीची गॅरंटी देणार असल्याचेही ते म्हणाले. 


प्रत्येक पदवीधर बेरोजगाराला पाहिले एक वर्ष नोकरी पक्की, सोबत 1 लाख रुपये अकाऊंट मध्ये टाकणार असल्याचे ते म्हणाले. 


कर्नाटकातील रेवन्नने 400 महिलांवर बलात्कार केला. नरेंद्र मोदींना माहिती असून त्यांनी त्याचा स्टेजवर प्रचार केला. नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्याविषयी उलट सुलट बोलतात. त्यांचा अवमान करतात. मोदींनी राजकारणाचा दर्जा राखला नसल्याची टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली. 


ही शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे.  महाराष्ट्र हे नैसर्गिकरित्या काँग्रेसी राज्य आहे. मला इथं आल्यानंतर आनंद वाटतो. पेपर फोडणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करणारा कायदा करणार असल्याचेही गांधी यावेळी म्हणाले.