Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. नाशिक लोकसभा मतदार संघातून लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगत छगन भुजबळ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडले. यानंतर हेमंत गोडसे नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान आता शांतिगीरी महाराजांचे नाव चर्चेत आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधून स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती मिळतेय.महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. त्यात आता शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.


सध्या शांतिगिरींना एबी फॉर्म देण्यात आलेला नसला तरी त्यांनी भरलेल्या फॉर्ममुळे महायुतीचे उमेदवार स्वामी शांतिगिरी तर होणार नाही ना अशी चर्चा सुरू झालीय.


कोण आहेत शांतिगीरी महाराज?


शांतिगिरी महाराजांना मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. त्यामुळे निवडणूक फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते.  2009 लोकसभा निवडणूक रिंगणात शांतीगिरी महाराज उतरले होते. त्यावेळी ते कोणत्या राजकीय पक्षातून निवडणूक लढवत नव्हते.  असे असताना त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतेली होती. यामुळे तक्रालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचे टेन्शन वाढले होते. पण या निवडणुकीनंतर त्यांनी राजकारणात फारसा रस दाखवला नाही. त्यात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शांतिगीरी महाराजांचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी शांतिगीरी महाराजांना केल्याची चर्चा होती. त्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून लढतील अशी शक्यता होती.


शिंदे गटाकडून एबी फॉर्म नाही


महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही...त्यात आता शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय...सध्या शांतिगिरींना एबी फॉर्म देण्यात आलेला नसला तरी त्यांनी भरलेल्या फॉर्ममुळे महायुतीचे उमेदवार स्वामी शांतिगिरी तर होणार नाही ना अशी चर्चा सुरू झालीय.


मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट


शांतिगीरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आपण येथून इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांना अपेक्षा असणे गैर नाही. ते हिंदुत्वाचा प्रचार करतात. हिंदुत्वासाठी लढतात. पण अखेरच्या टप्प्यात उमेदवारी कोणाला मिळणार हे एकनाथ शिंदे ठरवतील. नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.