Maratha Community Opinon: बहुतांश लोक गावापर्यंत गेले नाहीत.काहींना गावात, मंगल कार्यालयता बैठका लावल्या. आपल्यावर अन्याय झालाय. आपली त्यांनी जिरवली. आता त्यांची जिरवायचीय. आपले 35 ते 38 टक्के लोक अशिक्षित आहेत. त्यांना आपण समजवायचं आहे. निवडणूक म्हणजे एवढा मोठा लोकशाहीचा उत्सव आहे. यासाठी तुम्ही गावापर्यंतही जाऊ शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मी खूप साधारण माणूस आहे. मला राजकारण कळत नाही. मी राजकारणात असलो काय नसलो काय, माझ्यात दम आहे तुम्हाला आरक्षण मिळवून देण्याचा, असे ते म्हणाले. तुम्ही पूर्ण ताकदीने घुसायला हवे, असे ते म्हणाले. लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही, अशी घोषणा यावेळी मनोज जरांगेंनी यावेळी केली. ज्याला पाडायचंय त्याला पाडा. जो सगेसोयरे कायद्याला विरोध करेल त्याला पाडा, असे ते यावेळी म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातून निवडणूक लढवण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. जनतेने त्यांची मते जरांगेंना लिहून पाठवली. पण कार्यकर्ते समाजातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले नसल्याची खंत जरांगेंनी बोलून दाखवली. गावागावतून आलेली मते जरांगेंनी वाचून दाखवली. ती पुढीलप्रमाणे...


काहींनी गावात बैठका घेऊन एकमताने जाहीर पाठींबा दिला पण स्वत:च मत सांगितलं नाही.जो कोणी उमेदवार द्याल त्याला आमच्या संपूर्ण गावाचा पाठींबा असेल, असे काहींचे म्हणणे आहे. अपक्ष उमेदवार देऊ नये असे काहींचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले. कोणालाच मतदान करु नये आपलं मतदान नोटाला करावे, असे मतही समोर आलंय. ज्यांनी फसवणूक केली त्यांना मतदान करु नये अशी भूमिका काहींनी मांडली काहींनी ठराविक लोकांची भूमिका लिहून घेतली. यातून आपणच आपली फसवणूक करत असल्याची खंत जरांगेंनी व्यक्त केली. इथून पुढे अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 


राजकारणात गेल्याने आरक्षण विषय मागे राहतोय, असे मत काहींनी व्यक्त केलंय. आपले उमेदवार उभे न करता आपल्या मताची शक्ती दाखवा. वेळ अपुरा पडल्याचे मत काहींनी व्यक्त केले. ही सर्व मते जरांगेंनी वाचून दाखवली. त्यांच्या डावाला प्रतिडाव मला टाकायचाय. पण तुम्ही तिथपर्यंत जायलाच तयार नाही, तर मी काय करणार? असा प्रश्न त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना विचारला. 


अपक्ष उमेदवारीवर काय म्हणाले?


अपक्ष उमेदवार दिला तर अमुक तमूक जिंकून येईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्यावर जरांगे संतापले. आरक्षण पाहिजे तुम्हाला. गरीब मुलं तुमची. तुम्हाला नेता पाहिजे. नेता-पक्ष सोडायचा नाही मग तुम्ही मोठे कसे होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. लढलो तर तुमची ताकद दिसेल, असे ते म्हणाले.