Ajit Pawar Speech: मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो. मीदेखील घरातलाच आहे. वरिष्ठ  म्हणत होते सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. मी अनंतराव पवारांच्या पोटी जन्माला आलो म्हणून  मला अध्यक्ष नाही म्हणाले. बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी  मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले. यावेळी शरद पवार सुप्रिया सुळे यांना उद्देशून ते बोलत होते. काही जण भावनिक करतील. उद्या मी उभा केलेल्या उमेदवाराला माझा सर्व परिवार  उलटा प्रचार करणार आहे .आता तुम्ही माझा परिवारात मी मागील वीस पंचवीस वर्षे घासली आहे त्यामुळे तुमची जबाबदारी मोठी आहे.  माझ्या विचाराचा खासदार चांगल्या मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. आज तर मोठी  चूक झाली. एका कार्यकर्त्याच्या आई वारली. तर त्या म्हणाल्या तो कार्यकर्ताच वारला असे नका करू असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांना  अजित पवारांनी टोला लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जो उमेदवार उभा करणार आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघातील पाचही तालुक्यात लीड घेणार आहे. खडकवासला हा तर भाजपचा बालेकिल्ला आहेआता मला हे बघायचं आहे. इतर तालुक्यांपेक्षा बारामती ही विकासाच्या पाठीशी का भावनिक मुद्द्याच्या पाठीशी राहतात? हे मी उद्याच्या निवडणुकीत पाहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 


माझी  पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती आहे. आपला सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे रहा.. विकासाच्या बाबतीत बारामती तालुका पहिल्या क्रमांकाचा राहण्यासाठी आशीर्वाद द्या..उमेदवार लवकरच माहिती एकत्र बसून ठरवून देणार आहे. तोपर्यंत मला उमेदवार जाहीर करता येत नाही.
दबावाने प्रेशर खाली कुणीही राहू नका. काहीजण तिकडच्या बाजूने काम करतात. मला काही वाटत नाही की त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, मात्र त्यांना कधीतरी अजित पवारांची गरज लागेल त्यावेळेस मी त्यांना सोडणार नाही, असेही सांगायला ते विसरले नाहीत.


आमदारकिला  तुम्हाला आणि आत्ता  लोकसभेला इतरांना असे मला अजिबात चालणार नाही. या लोकसभेला नेहमीसारखे परिस्थिती नाही .कामाचा माणूस म्हणून माझी ओळख आहे केंद्रात आपल्या विचाराचा माणूस गेला पाहिजे
मी विरोधी पक्ष असताना तुम्ही मला निवेदने द्यायचात. मी प्रयत्न करतो. कामे होत असतील त्यांची सर्व कामे करायचे असे त्यांनी यावेळी म्हटले. 


आत्ताच्या घडीला कामाबाबत माझ्या सारखा तर कोणी नाही. मी शेतकऱ्याचा पुत्र असून शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील युवकांचा मेळावा एक मार्च रोजी बारामतीत घेत आहे या कार्यक्रमाचे पाच कोटीचे बजेट आहे हे केवळ बारामतीतील युवकांना रोजगार मेळावा म्हणून आपण करत आहोत. मी अतिशय स्पष्ट बोलणारा माणूस आहे. निवडणूक सुरुवातीपासून बारामती विरोधकांचे डिपॉझिट जप्त झालं विकास कामे केली आहेतय लोकसभेला मला तुम्ही साथ दिली तरच विधानसभेला उभा राहिन, असे ते म्हणाले. 


लोक येऊन भावनिक बनवतील 


वेगवेगळी लोक येऊन भावनिक बनवतील तुम्हाला विकास हवा आहे त्या भावनिक व्हायचा आहे ते तुम्ही ठरवायचे आहे. मी शब्दाचा पक्का माणूस आहे जर  तुम्ही लोकसभेला काय केलं तर पुढे मी माझ्याच पद्धतीने करणार आहे. बारामतीकरांनो  तुमच्यामुळे माझ्याकडे राज्याच्या अर्थमंत्रीची थैली आहे. बारामतीत मेडिकल हब झाले आहे. शैक्षणिक हब झाले आहे आपले विचारांचा खासदार आणा रेल्वे स्टेशनचे चांगल्या पद्धतीने काम केले जाईल 


मी गाडीत बातम्या पाहत होतो भास्कर जाधव यांच्या गाडीवर दगडफेक झाली. शिवराळ  भाषा खालच्या पातळीवर जाऊन कमरेखालचे वार करून अनेकजण भाषण करतात. मात्र ही बाब आम्ही सांभाळलेली  आहे. महाराष्ट्र,  पुणे जिल्हा,आणि   बारामतीचा विकास हा आपला अजेंडा आहे. यात कोणताही बदल होऊ शकत नाही. नव्या दमाच्या  कार्यकर्त्यांना संधी देणार हे आगामी  काळात करणार असल्याचे ते म्हणाले. 


मोदींशिवाय पर्याय नाही 


नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही..विरोधकांनी  इंडिया आघाडी  काढली होती. यामधून केजरीवाल, भगवंत मान, ममता बॅनर्जी, नितीश कुमार बाहेर पडले.  इंडिया आघाडीचा फुगा देखील फुटला आहे. आता विकासाला  साथ देणारा खासदार उद्याच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे त्यामुळे निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.