Loksabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मतदान सुरू असतानाच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या गोडाउनमधील सीसीटीव्ही बंद पडल्याचे समोर आले आहे. रविवारी सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमचे जे काही गोडाऊन आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बंद पडले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये काही काळंबेरं तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत तिथलेच सीसीटीव्ही बंद असल्याने खळबळ उडाली आहे. तसंच, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही संशय व्यक्त केला आहे. 


बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. त्या गोदमाचे सीसीटिव्ही सकाळी 10.50 पासून बंद पडलेले आहे. त्यामुळं यात काही काळंबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीये. मी त्या विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनाही फोन केला. पण त्यांचा काहीच रिप्लाय आला नाही. संबंधितांशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे कोणीही टेक्निशियन नाहीये. आमचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांना गोदाम दाखवत नाहीत. पोलिस म्हणतात आम्हाला काही सूचना मिळालेल्या नाहीत. काय चाललंय काय हे? असा सवाल शरद पवार गटाचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे. 


चौथ्या टप्प्यातील मतदान अन् ईव्हीएम मशीन बंद पडले


राज्यातील 11 मतदारसंघात आत चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. असं असतानाच काही मतदारसंघात ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. त्यामुळं मतदान प्रक्रियेत थोडा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळतेय. राजगुरूनगरमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय, जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदार तासभरापासून रांगेत उभे आहेत. अशा परिस्थितीत मतदान केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मतदारांनी घेतली आहे. तर, एकीकडे, मॉडेल कॉलनीतील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड मतदान यंत्र बदलण्यात येणार आहे.