पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला
Pune Vasant More: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठी घडामोड समोर येतेय. बारामती लोकसभेसाठी शरद पवार मनसे नेत्याची मदत घेणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठी घडामोड समोर येतेय. बारामती लोकसभेसाठी शरद पवार मनसे नेत्याची मदत घेणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे. वसंत मोरे हे राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचे समजले जातात. मशिद भोंगे प्रकरणावर वसंत मोरे यांनी स्वत:ची भूमिका मांडली होती. पण आपण कधीच मनसे सोडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. शरज पवारांच्या भेटीला गेलेल्या वसंत मोरे यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी रायगडावर तुतारी चिन्हाचे अनावरण केलं. त्यानंर 40 वर्षानंतर शरद पवारांना रायगडाची आठवण झाली. ते कधीच आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत नाहीत. मुस्लिम मते जातील, असे त्यांना वाटते, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची भेट महत्वाची मानली जात आहे. पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मनसेची मदत घेणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. पुणेकर मतदारांच्या भुवया उंचावणारी घटना घडली आहे. पुण्यातील निसर्ग कार्यालयात आज शरद पवार आले आहेत. ते बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा घेत आढावा घेत आहेत. दरम्यान मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. वसंत मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजित पवार यांचा गट बाहेर पडला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, घगन भुजबळ, सुनिल तटकरे असे महत्वाचे नेतेदेखील गेले. यानंतर शरद पवार एकटे पडल्याचे दिसत आहे. पण अशा अनेक प्रसंगातून शरद पवार बाहेर आले असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. आता शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले आहे. आयोगाकडून त्यांना तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह मिळालं आहे. गावागावातील सर्वसामान्य जनतेमध्ये शरद पवार म्हणजे घड्याळ हे समीकरण पक्क बसलेलं असताना, आता पवारांचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे, हे त्यांच्या मनात बिंबवण्याचं मोठ आव्हान आहे. यासाठी शरद पवार कामाला लागले आहेत. ते महत्वाच्या मतदार संघात जाऊन चाचपणी करत आहेत. बेरजेची गणित मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक नेते अजित पवारांसोबत गेल्याने रिक्त झालेल्या जागांवर तरुण, तडफदार नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आता पवार गट यासंदर्भात काय निर्णय घेतोय हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.