Satara Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणूक मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत. उदयनराज भोसले यांनी ठाकरे गटाचे उमेदवार शशिकात शिंदे याचा पराभव केला. विजयानंतर उदयनराजे भावूक झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. 


 2009 मध्ये उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosle) शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली. मात्र अवघ्या 3 महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या भर पावसातल्या सभेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलून टाकलं. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी भाजपच्या उदयराजेंना तब्बल 87 हजार मतांनी धूळ चारली होती.