Pratibha Dhanorkar wins Nagpur Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीत विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या चंद्रपुरातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला होती. मात्र पहिलीच परीक्षा देणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांना धुळ चारली. उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात त्यांना संघर्ष आणि टीकेचा सामना करावा लागला. पण काँग्रेसने दाखवलेला विश्वास त्यांनी खरा ठरवला. 


पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पास कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून अनेक आरोप प्रत्योपाला समोरे जावं लागलं. पक्षातील नेत्यांच्या त्रासामुळे पतीचा जीव गेला असा सूर त्यांनी आवळला. आता दुसरा जीव जाणार नाही, असा म्हणत त्यांनी थेट वडेट्टीवारांना लक्ष्य केलं. कुणबी समाजाच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाने एक पत्रक काढून वडेट्टीवार कसे वाईट आहे हे सांगण्यात आलं. या सगळ्यामुळे वडेट्टीवार कमालीचे अस्वस्थ झाले. जातीपातीचं राजकारण करुनही पक्षातील लोक अडचणीत आणत असल्याची टीका त्यांनी केली. पण धानोरकर यांनी हार मानली नाही आणि त्या जोमाने कामाला लागल्यात. 


पती सुरेश उर्फ बाळू धानोकर यांच्या प्रमाणेच प्रतिभा धानोरकर यांनी राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण कली. सुरुवातीपासून समाजकार्याची आवड असल्याने लग्नानंतर पतीसोबत त्या खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांच्या प्रयत्नातूनच महिलांना संरक्षण देणारा शक्ती कायदा तयार होत आहे. त्यामुळे शक्ती कायद्यासाठीच्या समितीवर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आलं. तसंत त्या काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. माहेरी राजकारणाचा काही संबंध नाही. पण लग्नानंतर त्यांना धानोरकर यांच्या कुटुंबातून राजकारणाचे धडे गिरवता आले. 


पती खासदार झाल्यानंतर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार कोण होणार असा प्रश्न असताना प्रतिभा यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीमुळे त्यांना काँग्रेसमधून नाराजीचा सामना करावा लागला. पण योग्य उमेदवार मिळत नसल्याने त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उभ करणात आलं. पहिलाच परीक्षेत त्या पास झाल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यातील त्या एकमेव महिला आमदार ठरल्या. 


त्यानंतर त्यांनी वंचित घटकांसाठी कामाला सुरुवात केली. तृतीयपंथीयांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर लावून धरली. कोरोना काळात त्यांनी काँग्रेस महिला प्रदेशने मदतीचा एक घास ही मोहीम राबवली. या मोहीमतर्गंत त्यांनी स्वत: पोळ्या लाटून महिलांना मदत केली.