पिंपरी चिंचवड :  पिंपरी गावठाणातल्या महालक्ष्मी मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली.रात्री दीडच्या सुमारास एका भामट्याने मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या अंगावरचे तब्बल 18 तोळ्यांचे दागिने लंपास केले.


विशेष म्हणजे या भामट्याचे हे कृत्य सी सी टी व्ही मध्ये कैद झालं आहे. तब्बल 5 लाखांची ही चोरी आहे..या संदर्भात पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.