सोलापूर : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Lop Devendra Fadnvis) यांचा सोलापूर दौरा (Solapur Tour) रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. (lop devendra fadnvis cancel solapur tour due to health)


नक्की कारण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमासाठी सोलापूरला येणार होते. मात्र फडणवीसांची एकाएकी प्रकृती बिघडल्याने दौरा रद्द करावा लागले. यामुळे पुढील सर्व नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले. तसेच आता फडणवीस मुंबईला परतत आहेत.


राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार


दरम्यान राज्यात अनेक दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकूण 6 जागांसाठी 7 उमेदवार असल्याने अपक्ष आमदारांचा भाव वाढलाय.
 
या सोलापूर दौऱ्यात फडणवीस राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 अपक्ष आमदारांची भेट घेणार होते. त्यामुळे फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वाचा मानला जात होता. फडणवीस या 2 अपक्षांना भेटणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता हा दौरा रद्द झालाय. त्यामुळे आता 10 जूनला होणाऱ्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.


आधी शस्त्रक्रिया मग कोरोना


दरम्यान राज ठाकरे यांनाही प्रकृतीमुळे काही दिवसांपूर्वी आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला.  मनसेप्रमुखांना आधी शस्त्रक्रियेमुळे मग कोरोना झाल्याने अयोध्या दौरा रद्द करावा लागला. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.