तुमच्या परवानगीने ही गुंडगिरी?, मधूर भांडारकरांचा राहुल गांधींना सवाल
या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल इंदू सरकार चित्रपटाचे दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी राहुल गांधींना केले आहेत.
नागपूर : या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल इंदू सरकार चित्रपटाचे दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी राहुल गांधींना केले आहेत.
नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला.काँग्रेसने पुण्यानंतर नागपुरातही इंदू सरकारचं प्रमोशन होऊ दिलं नाही. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नागपुरात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला.
या सर्व प्रकारानंतर मधुर भांडारकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काही सवाल केले आहेत. पुण्यानंतर नागपुरातीलही पत्रकार परिषद रद्द करावी लागली.
काँग्रेसचा इंदू सरकारला विरोध का?
मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. मात्र या सिनेमात काँग्रेसची बदनामी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
शिवाय हा सिनेमा भाजपने स्पॉन्सर केल्याचा दावाही काँग्रेसने केलाय. ज्यामुळे काँग्रेसकडून सिनेमाला विरोध केला जात आहे ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे
.
आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.
अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.