पोलीस भरतीत ट्रान्सजेंडर्सना संधी देणार `हे` पहिल राज्य
पोलीस आरक्षक भरतीसाठी १७ थर्ड जेंडर उमेदवारांनी अर्ज केला.
रायपुर : अनेक राज्यांमध्ये ट्रान्सजेंडर्सना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं दिसून येतय. यामध्ये आता छत्तीसगडचे नावही जोडले गेलय. महिला, पुरूषांसोबत ट्रान्सजेंडर यांनाही नोकरीमध्ये समानता देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरगुजामधील पोलीस आरक्षक भरतीसाठी १७ थर्ड जेंडर उमेदवारांनी अर्ज केला. पोलीस भरतीमध्ये अशी सुरूवात करणार छत्तीसगड पहिल राज्य आहे. न्यूज एजंसी ANI ने यासंदर्भातील वृत्त आहे. सरकारने घेतलेल्या पुढाकाराने आपण आनंदीत असल्याचे ट्रान्सजेंडरने सांगितले. आम्ही पूर्ण मेहनतीने ही परीक्षा देऊ असेही त्यांनी सांगितले. सरकारने यांना सर्वांच्या बरोबरीने दर्जा देऊन समान मुख्य प्रवाहात आणण्यास पुढाकार घेतलाय.
दोघांची निवड
सरकारच्या या पुढाकाराच सर्व स्तरातून कौतुक होतयं. तसेच भरती करणारे अधिकारीही या निर्णयाने आनंदीत दिसत आहेत. सर्वांसाठीट हा नवा अनुभव आहे. समाजात कोणताच वर्ग मागे राहू नये यासाठी उचललेल हे पाऊल आहे. एकूण १७ थर्ड जेंडर्सनी पोलीस आरक्षक पदासाठी अर्ज केले. ज्यामध्ये २ उमेदवारांची निवड झाली.