मुंबई : कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यावर नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीराला चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. यानंतर 'झी 24 तास'ने याचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता या 'चुंबक मॅन'ची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. याप्रकाराबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत.


लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, लस घेतल्यावर चुंबकीय ऊर्जा निर्माण झाली असेल तर तो दावा ग्राह्य धरू शकत नाही, असे नाशिकचे सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी म्हटले आहे. पण वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, यामागे नक्की काय आहे, ते तपासले जाईल. मेडिकल कारण काय आहे, हे तपासू या. त्यानंतर नक्की कशामुळे हे झाले आहे, ते पाहू.


तर दुसरीकडे कोविशिल्ड लस घेतक्यावर अरविंद सोनार यांच्या शरीरारात चुंबकत्व निर्माण झाल्याने अंधश्रद्धा समिर्तीने तातडीने पाहणी केली. याबाबत कुठलीही अंधश्रद्धा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठलेही गैरसमज न ठेवता यामागील वैज्ञानिक कारण शोधावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत गैरसमज न ठेवता यामागचे नक्की वैज्ञानिक कारण काय असेल ते शोधले पाहिजे, असे म्हटले आहे.


हा नक्की काय आहे प्रकार?



नाशिकमधील सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांनी कोविशिल्डचे दोन डोस घेतले. त्यानंतर त्यांच्या शरीराला चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. कुठल्याही धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर 'झी 24तास'ने तातडीने याचा मागोवा घेत यात फसवेगिरी नाही ना याचा शोध घेतला. 'झी 24तास'चे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी तातडीने अरविंद सोनार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या घरी जाऊन हा प्रकार तातडीने तपासला. 



'झी २४ तास'च्या कॅमेरासमोर सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून दाखवल्या. दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यानंतर लस घेतल्यावर समाज माध्यमात चुंबकत्व निर्माण होते असे समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला.  तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले.