मुंबई : अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळ अतितीव्र झालं असू आजपासून हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येणार आहे. बुधवारी रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि पोरबंदरदरम्यान किनारपट्टीला धडकणार असल्याने किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळाच्या प्रभावामुळे ताशी १३० ते १५५ किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्रात उंच लाटा निर्माण होणार आहेत. बुधवारपासून गुजरात, उत्तर कोकण किनारपट्टीवर अतिजोरदार पालघर इथे ताशी ४०ते ५० किमीवेगाने वारे वाहणार असून उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार इथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परत बोलवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वादळामुळे मोबाईल टॉवर्स कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी संपर्क यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे.



अवकाळी आणि 'महा' चक्रीवादळाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हतबल झाला आहे. मात्र देशाचा अन्नदाता असा हतबल होऊ देऊन कसे चालेल? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. त्याला खंबीर आधार देऊन उभे करावेच लागेल. काल अवकाळीने त्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला. आता 'महा'चक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंघावत आहे. सर्वांचा पोशिंदा अस्मानी आणि सुलतानीत्या कोंडीत गुदमरणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल. 


दिल्लीतील हवेच्या तुलनेत यंदा मुंबईतील हवेची गुणवत्ता देशातील इतर शहरांच्या तुलनेत समाधानकारक आहे. मुंबईत आज हवेची सरासरी गुणवत्ता ६२ वर आहे तर दिल्लीत हवेची गुणवत्ता ४११, अहमदाबादची ९० वर होती. यंदा दिवाळीत हवेची गुणवत्ता खालवली मात्र समुद्राकडुन जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे