पुण्यातील शिवसृष्टीबाबत सरकारचा डबल गेम उघड
पुण्यातील शिवसृष्टीबद्दल महाराष्ट्र शासनाचा डबल गेम उघड झाला आहे. पुण्यात दोन शिवसृष्टींना मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे : पुण्यातील शिवसृष्टीबद्दल महाराष्ट्र शासनाचा डबल गेम उघड झाला आहे. पुण्यात दोन शिवसृष्टींना मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मेगा प्रोजेक्टचा दर्जा
महापालिकेच्या शिवसृष्टीला मान्यता दिल्यानंतर, दोनच दिवसात बाबासाहेब पुरंदरे यांच्या आंबेगाव येथील शिवसृष्टीला मंजुरी देण्यात आलीये. आठ फेब्रुवारीला पुरंदरे यांच्या शिवसृष्टी संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केल्याय. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला २०१६ च्या पर्यटन धोरणानुसार मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यात आलाय.
इतके लागणार खर्च
पुरंदरे यांच्या शिवसृष्टी उभारणीसाठी तीनशे कोटी भांडवली खर्च अपेक्षित आहे. तसेच त्यातून थेट तीनशे रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे पर्यटन धोरणानुसार मेगा प्रोजेक्ट चा दर्जा देण्यात आला आहे. मेगा प्रोजेक्टचा दर्जा मिळाल्याने संपुर्ण स्थिर भांडवली खर्चाची रक्कम सरकार अनुदान म्हणून देणार आहे. त्याचबरोबर दहा वर्षापंर्यत दरवर्षी प्रोत्साहनपर अनुदान देखील देणार आहे. तसेच, विविध करात, विद्युत शुल्कात, मुद्रांक शुल्कात सुट मिळणार आहे. अनेक परवानग्या देखील पाच वर्षात एकदाच काढाव्या लागणार आहेत.
शिवसृष्टी होणार का?
बीडीपी मुळे महापालिकेची शिवसृष्टी होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच तीनशे कोटी रुपये खर्चाच्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टी ला मान्यता दिल्याने महापालिकेची शिवसृष्टी होण्याबाबत शंका आहे.