सातारा : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठई आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरला लाखो पर्यटकांनी पसंती दिली. पण त्यानंतर महाबळेश्वरमध्ये कच-याचं साम्राज्य पसरलं होतं. 


तब्बल 3 टन कचरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण कचरा साफ करायला नगरपालिका कर्मचा-यांना, रात्री 1 ते पहाटे पाचपर्यंत मेहनत घ्यावी लागली. तब्बल 3 टन कचरा इथून काढण्यात आला. 


दारुच्या बाटल्यांचा खच


वेण्णा लेक इथे 6 अंशावर पारा घसरलेला असतानाही अशा कडाक्याच्या थंडीतही सफाई कर्मचारी काम करत होते. पर्यटकांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात केलेल्या पार्ट्या दारुच्या बाटल्यांचा खच पहायला मिळाला. 


चार तासात कचरा साफ


पण पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन ते चार तासांत हा सगळा कचरा साफ करून नववर्षाचं स्वागत, साफसफाई करत आणि स्वच्छतेचा संदेश देत केलंय. 


पर्य़टकांनी भान राखायला हवं


इथे आलेल्या पर्यटकांनीच जर भान राखलं असतं आणि अस्वच्छता केली नसती तर कडाक्याच्या थंडीत या कर्मचा-यांनाही काम करावं लागलं नसतं. निदान आतातरी नववर्षाचे संकल्प सोडताना स्वच्छतेचा संकल्प करुया आणि कामाला लागू या.