महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा
महाबळेश्वरमध्ये मिळणारं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम सगळंच महाग होणार आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करत असाल तर खिसा जास्त हलका करण्याची तयारी ठेवा. कारण महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी महागलीय,. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये मिळणारं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम सगळंच महाग होणार आहे.
लालचुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वर, पाचगणीची शान आहे. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे स्ट्रॉबेरी प्रचंड महाग झालीय. एरवी २०० रुपये किलोनं मिळणारी स्ट्रॉबेरी तब्बल ८०० रुपये किलोवर पोहोचलीय.
स्ट्रॉबेरीची रोपं मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. यंदा लॉकडाऊनमुळे रोपं मागवण्यात आली नाहीत. त्यामुळे कमी क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली. परिणामी स्ट्रॉबेरी महागली.
सध्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी ८०० रुपये किलो मिळतेय. लवकरच ती हजार रुपयांवर जाण्याची भीती आहे.