महाबळेश्वर : मिनी काश्मीर अशी महाबळेश्वरची ओळख आहे. राज्यात एकीकडे उन्हाचा पारा चढलेला असताना मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये मात्र अचानक थंडी वाढलीये.


महाबळेश्वरच्या वेण्णा लेक लिंग मळा परिसरात तापमानाचा पारा ४ अंशावर उतरलाय. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात गुलाबी थंडीचा आनंद महाबळेश्वरमधील पर्यटकांना यानिमित्तानं लुटायला मिळतोय.