भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे एक घटना घडलीय. नरेश गोविंद तलांजे ( वय 35 वर्ष ) यांच्या आईने सायंकाळी भाजीला काही विशेष मिळालं नाही. मग तिने मेथीची भाजी बनविली. मात्र, नरेशला ती भाजी आवडली नाही. दुसरी भाजी का केली नाही त्यावरून त्याने आईला शिवीगाळ सुरु केली. यात वडिलमध्ये पडल्याने त्याचा संताप आणखी वाढला. होता होता वाद वाढला आणि घरात भांडणाचं महाभारत सुरु झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, घराजवळच वेगळी राहत असलेली मोठी सुन देवकाला ही वादावादी ऐकू आली. देवका हिने दिरास जाब विचारायला सुरवात केली. तू काही काम धंदे करत नाही आणि आरणावरून शिवीगाळ करतोस असे म्हणत तिने दिराला झापले.


नरेश आधीच संतापला होता त्यात वहिनीकडूनही मिळालेल्या शाब्दिक माराने त्यात अधिक भर पडली. संतापाच्या भरात त्याने आतल्या खोलीतून ब्लेड आणले आणि वहिनीच्या गालावर वार केला.


नरेशने केलेल्या या हल्यात देवका जखमी झाली. तिला तातडीने मोहाड़ी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हा प्रकार घडताच आरोपी दिर तेथून फरार झाला. उपचारानंतर जखमी वहिनीने करडी पोलिसात दिराविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून दिराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून करडी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.