अलिबाग : भोर घाटात दरड रस्‍त्‍यावर आल्याने महाड पुणे वाहतूक ठप्‍प पडली. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड ते पुणे दरम्‍यानच्‍या मार्गावर भोर घाटात दरड रस्‍त्‍यावर आल्‍याने या मार्गावरील वाहतूक ठप्‍प झाली आहे . घाटात वाघजाई जवळ भोर तालुक्‍यातील  उंबर्डे गावाजवळ डोंगरातून मोठमोठे दगड रस्‍त्‍यावर आले . त्‍यामुळे महाडवरून पुण्‍याला जाणारा मार्ग बंद झाला आहे.


आता या मार्गावरील वाहतूक ताम्‍हाणी घाट तसेच महाबळेश्‍वर मार्गे वळवण्‍यात आली  आहे. उंबर्डेजवळ रस्‍त्‍यावर आलेली दरड बाजूला करण्‍याचे काम आता सुरू झाले आहे.