Sharad Pawar on Rashmi Shukla: विधानसभा निवडणुकीला एक महिना राहिला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पण राज्यातील विविध ठिकाणी नाराज नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थोडा वेळ शिल्लक असताना महाविकास आघाडीकडून सावध पवित्रा घेण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात जाऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. यावेळी शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. 


जे ऐकणार नाही त्यांच्यावर कारवाई, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीजणांनी वैयक्तिक उमेदवारी अर्ज भरले आहेत. यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. आज 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. कोणीही एकमेकांच्या विरोधात न लढता एकत्र काम करावे, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू, जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी कामगार पक्षासोबत चर्चा झाली. अलिबाग, पेण आणि पनवेल येथे शेकाप जागा लढवले. उरणला शेकाप अर्ज मागे घेईल. आणखी काही ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.


'निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य'


पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्लांची अखेर बदली करण्यात आलीय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. राज्य सरकारसह त्यांनी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला पत्रेही पाठवली होती. अखेर निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाचे बदलीचे निर्देश दिलेत. रश्मी शुक्लांच्या जागेवर नवीन नियुक्ती केली जाणारेय. त्यासाठी 3 IPS अधिका-यांचं पॅनल तयार केलं जाणारेय. दरम्यान, निवडणूक आयोगानं अखेर दखल घेतली. दरम्यान शरद पवारांना याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले. रश्मी शुक्ला यांची बदली करुन निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय आहे. ज्या व्यक्तीबद्दल जाहीरपणे सर्वजण बोलतात, सत्तेचा गैरवापर करुन त्यांना जबाबदारी देण्यात आली होती, त्यांच्याबाबत असा निर्णय घेणे योग्य असल्याचे पवार म्हणाले. 


जरांगेंबद्दल काय म्हणाले?


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा लढणार असल्याची घोषणा केली होती. पण उमेदवारी अर्ज भरायला एक दिवस शिल्लक असताना त्यांनी हा निर्णय मागे घेतलाय. 'मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा निर्णय योग्य आहे,' अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 


बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न 


शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक झाली असून परांडा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार असल्याची माहिती समोर येतेय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून बंडखोर उमेदवारांची फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांगोलातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणुकीवर ठाम असल्याची माहिती आहे.


पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी अजित पवार गटानं केली होती. तसेट चिन्हाबाबतची माहिती सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. दरम्यान बुधवारपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.