महाराष्ट्राचे Green Energy क्षेत्रात मोठे पाऊल! NTPC, अदानी यांच्यासोबत महत्वाचे करार; हजारो रोजगार होणार निर्माण
Maharashtra Electricity Generation: आज झालेल्या करारात एनटीपीसी, वेल्सपुन न्यू एनर्जी लि, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो, टीएचडीसीआयएल आणि अदानी पॉवरचा समावेश होता.
Maharashtra Electricity Generation: महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला. 2030 पर्यंत राज्यातील 50 टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार असल्याची माहिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक झाली. यात महत्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. आज झालेल्या करारात एनटीपीसी, वेल्सपुन न्यू एनर्जी लि, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो, टीएचडीसीआयएल आणि अदानी पॉवरचा समावेश होता.
62 हजार 550 रोजगार निर्माण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकाराने पंप स्टोरेजचे राज्यात विक्रमी करार करण्यात आले.आज एकूण 35,240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार करण्यात आले.यात एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. यातून एकूण 62 हजार 550 रोजगार निर्माण होणार आहेत.
40,870 मेगा वॉट पंप स्टोरेज
आतापर्यंत एकूण 40,870 मेगा वॉट पंप स्टोरेजचे करार करण्यात आले आहेत. यातूण एकूण 2 लाख 13 हजार 381 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून एकूण 71 हजार 950 इतकी रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठे पाऊल
राज्याची एकूण स्थापित क्षमता 46,000 मेगा वॉट इतकी आहे. त्यातून 40,870 मे.वॉ.चे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठे पाऊल मानले जात आहे.