Amaravati Vidhansabha: विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचलाय. त्यातच अमरावतीत महाविकास आघाडीत या ना त्या कारणावरून खटके उडत आहेत.काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा आरोप केलाय. अमरावतीत मविआत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत. पश्चिम विदर्भातील काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेल्या खळबळजनक आरोप याला कारण ठरलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनील व-हाडे यांनी तब्बल 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय.एवढचं नाही तर ते पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचंही ठाकूर यांचं म्हणण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशोमती ठाकुरांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार व-हाडे यांनी केलाय. एवढच नाही तर त्यांच्याविरोधात  मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वऱ्हाडे यांनी दिलाय.निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत नाही तोच यशोमती ठाकुरांकडून सहकारी पक्षाच्या नेत्याविरोधात खंडणीचा आरोप केला गेलाय.त्यामुळे अमरावतीत मविआत सारं काही अलबेल नसल्याचं दिसतंय. याचा परिणाम मतदानावर होणार की यातून काही मार्ग निघणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच.


'पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात' 


288 पैकी 163 जागेवर अपक्षांना पिपाणी चिन्हं दिलं. भाजप रडीचा डाव खेळतोय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय. अजित पवारांनीही स्वतः साता-याच्या सभेत याबाबत कबुली दिली होती, असंही सुळे म्हणाल्या.लोकसभा निवडणुकीला पिपाणीवाल्या उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या तुतारीवाल्यांची मोठ्या प्रमाणात मतं खाल्ली होती. विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 288 मतदारसंघांपैकी तब्बल 163 मतदारसंघात ट्रॅम्पेट म्हणजे पिपाणीवाले उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभेला टॅम्पेटवाल्या तुतारीच्या चकव्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची लाखो मतं वाया गेली होती. सातारा लोकसभा निवडणुकीत ट्रॅम्पेटमुळं शशिकांत शिंदेंचा पराभव झाला होता. तशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही दिली होती.विधानसभेलाही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चकवा देण्यासाठी पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात भाजपनं उतरवल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. भाजप रडीचा डाव खेळत असल्याचा आरोपही सुप्रियांनी केलाय.सुप्रिया सुळेंच्या या आरोपांवर भाजपनं पलटवार केलाय. टॅम्पेट हे निवडणूक चिन्हं भाजप वाटत नसून ते निवडणूक आयोग वाटून देतं याचा सुप्रिया सुळेंना विसर पडला का असा टोला भाजपनं लगावलाय. तुतारीवाला माणूस घराघरात गेल्याचं लोकसभेच्या निकालातून अधोरेखित झालंय. तरीही विधानसभेला पिपाणीचा फंडा मविआला मारक ठरतो का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.


बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?


बडनेरा मतदारसंघ हा अमरावतीतील सर्वात चर्चेतील मतदारंसघ आहे. मात्र याच बडनेरा मतदारसंघात बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवलाय.. या बंडखोरांमुळे विद्यमान आमदार रवी राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात बंडखोरांचं पीक आलंय. मविआ आणि महायुतीत बंडखोरांचा बंडाचा झेंडा कायम आहे. त्यामुळं विद्यमान आमदार रवी राणांचं सँन्डविच झाल्याचं पाहायला मिळतंय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवी राणा रिंगणात आहेत.  त्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय अपक्ष रिंगणात उतरलेत.बडनेरा मतदारसंघातून हॅट्रीक मारलेले रवी राणा यांना यावेळी महायुतीचा पाठींबा आहे. मात्र, रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.दुसरीकडे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी मविआतून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केलीये.. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय.. मी बंडखोर उमेदवार नसून पर्यायी उमेदवार असल्याचा दावा प्रीती बंड यांनी केलाय. बडनेरा विधानसभा मतदारसंघात आता 20 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती आणि मविआतले बंडखोर असल्यानं या मतदारसंघात थेट कुणाचा कुणाशी सामना होईल हे सांगता येत नाही.